Bamboo Farming : पृथ्वी रक्षणासाठी बांबू शेती उपयुक्त : पाशा पटेल

Pasha Patel : जागतिक तापमानातील वाढ, वातावरणातील बदल आणि कार्बन उत्सर्जनाच्या वाढत्या प्रमाणामुळे मानवजाती व पृथ्वी धोक्याच्या उंबरठ्यावर आहे. या मानवजाती व पृथ्वीला वाचविण्यासाठी बांबू शेती करणे अत्यंत उपयुक्त ठरेल.
Pasha Patel
Pasha PatelAgrowon
Published on
Updated on

Mumbai News : जागतिक तापमानातील वाढ, वातावरणातील बदल आणि कार्बन उत्सर्जनाच्या वाढत्या प्रमाणामुळे मानवजाती व पृथ्वी धोक्याच्या उंबरठ्यावर आहे. या मानवजाती व पृथ्वीला वाचविण्यासाठी बांबू शेती करणे अत्यंत उपयुक्त ठरेल, असे मत जागतिक बांबू दिनानिमित्त आयोजित चर्चासत्राच्या उद्‌घाटनप्रसंगी राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमाला पद्मश्री पुरस्कार प्राप्त भारत भूषण त्यागी, कमल सिंग, गेनाजी चौधरी, सुलतान सिंग, चंद्रशेखर, जगदीश प्रसाद पारेख, ‘मनरेगा’चे महासंचालक नंदकुमार, प्रधान सचिव प्रवीण दराडे आदी उपस्थित होते.

Pasha Patel
Bamboo Farming : बांबू भविष्यामध्ये वाचविणारा पर्याय : पाशा पटेल

पाशा पटेल म्हणाले, ‘‘भारतातील राज्यांमध्ये तापमानात वाढल्याची नोंद झाली आहे. दुबईत सुद्धा प्रचंड तापमानात वाढ झाली आहे. कार्बन उत्सर्जनामुळे ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत चालले आहे. ऑक्सिजन वाढविण्यासाठी झाडे लावल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरित ऊर्जेच्या दिशेने पाऊल टाकले आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्य शासनाने हरित महाराष्ट्र बनविण्यासाठी ठोस निर्णय घेतला आहे.

या निर्णयामुळे शाश्‍वत उत्पन्नासाठी बांबू शेतीची संधी शेतकऱ्यांना मिळाली आहे. शेतकऱ्यांनी कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारी आणि सर्वाधिक ऑक्सिजन निर्माण करणारी बांबू शेती करण्याची गरज आहे. या चर्चासत्र कार्यक्रमामुळे शेतकरी, शास्त्रज्ञ आणि सरकार यांना एका छताखाली आल्याने मोठी संधी उपलब्ध झाली आहे. बांबू शेतीसाठी महाराष्ट्रातच नाही तर देशभरात काम करावे लागेल.’’

Pasha Patel
Bamboo Cultivation : बांबू लागवडीचे ५ लाखांवरील अर्ज ‘नरेगा’चे पोर्टल घेईना

भारत भूषण त्यागी म्हणाले, ‘‘महाराष्ट्रात होत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. पर्यावरण संवर्धनासाठी मानवी चेतना जागृत करण्याची गरज आहे. बांबू हे केवळ झाड नसून नैसर्गिक संरचनेतील महत्त्वाचा अंग आहे. बांबू शेतीची महाराष्ट्रातून पायाभरणी होत आहे.’’

या वेळी ‘एमआरईजीएस’चे महासंचालक नंदकुमार, प्रधान सचिव प्रवीण दराडे यांनी राज्य शासनाच्या ‘हरित महाराष्ट्र’ या योजनेविषयी माहिती दिली. या कार्यक्रमात राजस्थान, गुजरात, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, झारखंड, आसाम, पंजाब, मध्य प्रदेश, कर्नाटक, पश्‍चिम बंगाल आदी राज्यांतील प्रगतिशील शेतकरी, आयआयटी दिल्ली, खरगपूर, विविध संशोधन संस्थांमधील शास्त्रज्ञ, उद्योजक, शेतकरी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com