Bamboo Cultivation : बांबू लागवडीचे ५ लाखांवरील अर्ज ‘नरेगा’चे पोर्टल घेईना

Bamboo Farming : शेतकऱ्यांना पारंपरिक पिकांच्या चाकोरीतून बाहेर काढण्याच्या उद्देशाने तसेच उत्पन्न वाढीसाठी राज्यात बांबू लागवडीला प्रोत्साहन दिले जात आहे.
Bamboo
BambooAgrowon
Published on
Updated on

Akola News : शेतकऱ्यांना पारंपरिक पिकांच्या चाकोरीतून बाहेर काढण्याच्या उद्देशाने तसेच उत्पन्न वाढीसाठी राज्यात बांबू लागवडीला प्रोत्साहन दिले जात आहे. यासाठी पुढे आलेल्या शेतकऱ्यांचे ‘नरेगा’च्या पोर्टलवर ५ लाखांवरील रकमेचे अर्ज अपलोड होत नसल्याने हे शेतकरी गेल्या काही दिवसांपासून चिंतातुर झाले आहेत.

या योजनेला सात लाखांचे पाठबळ दिले जाणार असताना तेवढ्या रकमेचे अर्ज न घेण्याचे कारण समजत नसल्याने अनुदानावरून गोंधळाची स्थिती बनण्याची चिन्हे आहेत.

Bamboo
Bamboo Cultivation : ‘हरित महाराष्ट्र’अंतर्गत ‘मनरेगा’तून बांबू लागवड

राज्यात मुख्यमंत्री मिशन बांबू -हरित महाराष्ट्र कार्यक्रम राबविला जात आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून पहिल्या वर्षी एक लाख (तीन वर्षांत ५.२५ लाख) हेक्टरवर बांबू लागवडीचे उद्दिष्ट दिल्या गेले आहे. यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत बांबू लागवडीचा कार्यक्रम आखण्यात आला.

Bamboo
Bamboo Farming : बांबू भविष्यामध्ये वाचविणारा पर्याय : पाशा पटेल

शेतकऱ्यांना हेक्टरी ७ लाख ४ हजार रुपये अर्थसाह्य मिळणार आहे. यात सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांचे आधीच काही ठिकाणी प्रशिक्षणसुद्धा घेण्यात आले. यामध्ये बांबूचे महत्त्व, जाती, व्यवस्थापन अशा विविध बाबींचे मार्गदर्शन देत शेतकरी प्रशिक्षित करण्यात आला. आता शेतकऱ्यांनी यानुसार बांबू लागवडीसाठी अंदाजपत्रक तयार केले आहेत.

आमची शेतकरी उत्पादक कंपनी बांबू लागवड व प्रक्रिया क्षेत्रात काम करीत आहे. कंपनीने शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले. काही शेतकऱ्यांना चंद्रपूरच्या बांबू संशोधन केंद्रात प्रशिक्षणही दिले. आता या शेतकऱ्यांचे अंदाजपत्रक तयार करून ‘नरेगा’च्या पोर्टलवर अपलोड करण्याची प्रक्रिया राबवित असताना पाच लाखांवरील अर्ज घेतच नसल्याचे दिसून आले. यंत्रणांनी तातडीने या बाबत मार्ग काढण्याची गरज आहे. तरच लागवडीची प्रक्रिया पुढे जाऊ शकेल.
युवराज राठोड, अध्यक्ष, नियोजित नियु फार्म प्रा. लि., सोमेश्‍वर नगर, जि. वाशीम

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com