Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : पीकविम्यासाठी बीडमधून विक्रमी साडेसतरा लाख अर्ज

Rabi Crop Insurance : ठाणे, पालघर जिल्ह्यांमधून एकाही शेतकऱ्याने पंतप्रधान पीकविमा योजनेच्या रब्बी हंगामात सहभाग घेतलेला नाही.

मनोज कापडे

Pune News : ठाणे, पालघर जिल्ह्यांमधून एकाही शेतकऱ्याने पंतप्रधान पीकविमा योजनेच्या रब्बी हंगामात सहभाग घेतलेला नाही. उलट बीड जिल्ह्यातून तब्बल साडेसतरा लाख शेतकरी सहभागी झाले आहेत.

एक रुपया शुल्क भरून विमा योजनेत शेतकऱ्यांना सहभाग घेण्याची सुविधा खरिपानंतर रब्बी हंगामातही देण्यात आली होती. त्यामुळे गेल्या हंगामापेक्षा ४४.०८ लाख हेक्टर इतके जास्त क्षेत्र यंदा विमा संरक्षित झाले आहे.

कांदा, गहू व हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी विमा अर्ज भरण्याची अंतिम मुदत १५ डिसेंबरपर्यंत अंतिम मुदत होती. शेवटच्या दिवशीही हजारो अर्ज दाखल झाले. विशेष म्हणजे गेल्या हंगामापेक्षा यंदाच्या रब्बीसाठी ६३.९४ लाख अर्ज जादा आले आहेत. सर्व पिके मिळून राज्यभरातून आलेल्या एकूण अर्जांची संख्या आता ७१.३९ लाखापर्यंत पोहोचली आहे. यातून विमा संरक्षित क्षेत्र वाढून ४९.४२ लाख हेक्टरपर्यंत पोहोचले आहे.

रब्बीसाठी यंदा जिल्हानिहाय दाखल झालेल्या विमा अर्जांची संख्या अशी ः ठाणे व पालघर शून्य, रायगड ३, रत्नागिरी १६, सिंधुदुर्ग ४६, नाशिक १०४३७७, धुळे ७२७२४, नंदुरबार ९१७६, जळगाव ६४७१३, अहमदनगर ६२५९३८, पुणे १०९११४, सोलापूर ३७६४९०, सातारा ४३२८९, सांगली ५२३०९, कोल्हापूर ७९९,

छत्रपती संभाजीनगर ३३९९७१, जालना ६०६९८१, बीड १२३४४६१, लातूर ५२९७४९, धाराशीव ७१५७१५, नांदेड ५००३४५, परभणी ५२३६२१, हिंगोली १९८०१९, बुलडाणा ३०३७२३, अमरावती ६१२७५, अकोला १५२५४९, वाशीम १५२६०५, यवतमाळ २०७३४९, वर्धा २७१३७, नागपूर ४८८६०, भंडारा १५७३, गोंदिया ५०४, चंद्रपूर ९८९२, गडचिरोली ६४९.

भात, भुईमुगासाठी ३१ मार्चपर्यंत मुदत

रब्बी हंगामातील पिकांसाठी विमा योजनेकरिता भाग घेण्याची सर्व पिकांची अंतिम मुदत आता संपलेली आहे. मात्र उन्हाळी भात व उन्हाळी भुईमूग उत्पादित करणाऱ्या शेतकऱ्यांना येत्या ३१ मार्च २०२४ पर्यंत अर्ज दाखल करता येतील, असे कृषी विभागाने स्पष्ट केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Protest: सक्तीच्या वसुली विरोधात शेतात फडकवले काळे झेंडे

Kalmana APMC: कळमना ‘एपीएमसी’ची ‘एसआयटी’ चौकशी अवैध

Heavy Rain: परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील अतिवृष्टीने पिके मातीमोल

Gold Silver Rate: सोने-चांदी दरात वाढीचा कल

Sugar Recovery Theft: इथेनॉलच्या नावाखाली उतारा चोरीचा संशय

SCROLL FOR NEXT