Nilesh Lanke Agrowon
ॲग्रो विशेष

Leopard Wildlife Sanctuary: अहिल्यानगरला बिबट्यांसाठी उभारणार संरक्षित क्षेत्र

Farmers Demand Wildlife Sanctuary for Safety: अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्यांच्या वाढत्या संख्येमुळे शेतकरी आणि नागरिक त्रस्त झाले आहेत. आता या समस्येवर उपाय म्हणून ५०० एकर जागेत बिबट्यांसाठी संरक्षित क्षेत्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Team Agrowon

Ahilyanagar News: अहिल्यानगर जिल्ह्यात सध्या सर्वच भागात बिबट्याचा धुमाकुळ सुरू आहे. माणसांवर, पाळीव प्राण्यांवर हल्ले होत असल्याने शेतकरी, नागरिक त्रस्त आहे. या त्रासातून सुटका होण्यासाठी शासनाच्या ५०० एकर जमिनीवर तटबंदी करून बिबट्यांसाठी संरक्षित क्षेत्र उभे करण्याच्या मागणीला केंद्रीय वनमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

असे संरक्षित क्षेत्र उभारून मानवी वस्त्यांमध्ये आढळणारे बिबटे त्या क्षेत्रात सोडण्याबाबत कार्यवाही होईल, असे केंद्रीय वनमंत्री भुपेंद्र यादव यांनी अश्वासन दिले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता, राहुरी, कोपरगाव, संगमनेर, अकोले, पारनेर, श्रीगोंदा भागात बिबट्याची संख्या अधिक आहे. अहिल्यानगर, जामखेड, पाथर्डी, कर्जत तालुक्यांतही बिबटे आता आढळून येत आहेत. माणसांसह वन्यप्राणी आणि पाळीव प्राण्यांवर होणारे हल्ले वाढत आहेत. त्यामुळे शेतीकामात अडथळे येत असल्याने शेतकरी, नागरिक त्रस्त झाले आहेत.

त्यामुळे अहिल्यानगर दक्षिणचे खासदार नीलेश लंके यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील बिबट्यांची वाढती संख्या व माणसांवर होणारे वारंवार हल्ले यावर उपाययोजना करण्याची मागणी केंद्रीय वन मंत्री भुपेंद्र यादव यांच्याकडे केली. त्या संदर्भातचे निवेदन केंद्रीय मंत्री यादव यांना देण्यात आले. या निवेदनात असे म्हटले आहे, की सह्याद्री पर्वत रांगेत तसेच महाराष्ट्राच्या अन्य पठारी व पर्वतीय भागांत बिबट्यांची संख्या झपाट्याने वाढत असून ते नरभक्षक होत आहेत.

त्यातून वन्यजीव व मनुष्यामध्ये संघर्ष होत आहे. वन्य प्राण्यांकडून शेतामध्ये काम करणारे शेतकरी तसेच जंगल क्षेत्रात राहणारे आदिवासी यांच्यावरील हल्ल्यांच्या घटनांमध्ये मोठी वाढ होताना दिसत आहे. अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघात ऊस शेतीचे क्षेत्र अधिक आहे. ऊस क्षेत्र बिबट्यांना लपण्यासाठी तसेच प्रजननासाठी सुरक्षित आहे.

त्यातून बिबट्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यासाठी बिबट्यांची नसबंदी करण्यासंदर्भातील योजना राबवावी. त्या माध्यमातून बिबट्यांची संख्या नियंत्रित ठेवण्यास मदत होऊन मानव व वन्यजीवांमधील संघर्ष कमी होऊ शकेल. तसेच जीवन आणि मालमत्तेचे नुकसान होणार नाही, असे निवेदनात म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Farmer Flood Package: अतिवृष्टीच्या ‘पॅकेज’चा फुसका बार; शेतकऱ्यांशी पुन्हा एकदा शब्दांची चलाखी

Crop Damage Compensation : संत्रा-मोसंबी बागायतदारांना भरपाई देण्याची मागणी

Trap Crops: रब्बीत सापळा पिकांतून करा कीड-रोग नियंत्रण; सोप्या पध्दतीने होतो फायदा

PM Kisan 21st Installment: जम्मू-काश्मीरमधील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले २ हजार, महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना कधी मिळणार २१ वा हप्ता?

Farmer Compensation : भरीव मदतीसाठी ‘प्रहार’चे ताटवाटी आंदोलन

SCROLL FOR NEXT