Jejuri Yatra Agrowon
ॲग्रो विशेष

Somvati Palkhi Ceremony : खंडोबा गडावर भर उन्हात रंगला ‘सोमवती’चा पालखी सोहळा

Jejuri Yatra : श्री क्षेत्र जेजुरीत सोमवारी (ता. ८) दुपारी खंडोबाचा सोमवती पालखी सोहळा रंगला होता.

Team Agrowon

Pune News : श्री क्षेत्र जेजुरीत सोमवारी (ता. ८) दुपारी खंडोबाचा सोमवती पालखी सोहळा रंगला होता. भंडाऱ्याची मुक्त उधळण करित भाविकांनी सोहळा सोनेरी केला. सोमवती यात्रेला सुमारे दोन लाख भाविकांनी गर्दी केली होती.

सोमवारी अमावस्या आली की जेजुरीत खंडोबाची यात्रा भरते. सोमवारी (ता. ८) दिवसभर अमावस्या असल्याने भरसोमवती यात्रा भरली होती. दुपारी एक वाजता गडावरून पालखीचे प्रस्थान झाले. या वेळी मुख्य मानकरी राजेंद्र पेशवे, सचिन पेशवे, खांदेकरी मानकरी मंडळाचे अध्यक्ष जालिंदर खोमणे, गणेश आगलावे, देवसंस्थानचे मुख्य विश्वस्त अनिल सौंदडे, विश्वस्त ॲड. विश्वास पानसे, ॲड. पांडुरंग थोरवे, पोपटराव खोमणे, मंगेश घोणे, डॉ. राजेंद्र खेडेकर, अभिजित देवकाते आदी उपस्थित होते.

पालखीची मंदिर प्रदक्षिणा सुरू असताना भाविक सज्ज्यावरून पोत्याने भंडारा उधळत खंडोबाचा जयघोष करित होते. भर उन्हातही खांदेकरी व मानकरी व भाविक गर्दी करून होते. पालखीला सायंकाळी पाच वाजता कऱ्हा नदीवर स्नान घालण्यात आले. परिसरातील शेतकऱ्यांनी पुढाकार घेतल्याने खंडोबाच्या स्नानासाठी नदीमध्ये डोह तयार करण्यात आला होता. कऱ्हा नदीच्या पाण्याने व दही-दुधाने खंडोबाच्या उत्सवमूर्तींना स्नान घालण्यात आले.

त्यानंतर पालखी धालेवाडी, कोरपडमळा मार्गे सायंकाळी जेजुरीत आली. जानुबाई मंदिरात स्थानिक नागरिकांच्या दर्शनासाठी पालखी ठेवण्यात आली होती. त्यानंतर पालखी रात्री गडावर आणण्यात आली. उत्सवमूर्ती भंडारगृहात ठेवल्यानंतर रोजमारा मारून पालखी सोहळ्याची सांगता झाली.

दूरचे भाविक रविवारी रात्री व सोमवारी पहाटे दर्शनासाठी गर्दी करित होते. सोमवारी पहाटे साडेतीन वाजता मंदिर उघडण्यात आले. त्या वेळी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दिवसभर रांगा लावून भाविक दर्शन घेत होते. नदीवरही भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती.

भर उन्हात पालखी सोहळा असल्याने देवसंस्थाच्या वतीने खांदेकऱ्यांसाठी पायमोजे व टोप्या पुरविण्यात आल्या. देवसंस्थानच्या वतीने पिण्याचे पाणी, सरबत व नाष्टा पुरविण्यात आला. रात्री खांदेकरी व मानकरी यांच्यासाठी रात्रीच्या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आल्याचे विश्वस्त मंडळाने सांगितले. जेजुरी पोलिसांकडून वाहतूक व पालखी सोहळा सुरळीत करण्यासाठी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cabbage Farming: कोबी पिकात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब

Brazil Agricultural Cooperation: ब्राझीलसोबत कृषी क्षेत्रामध्ये सहकार्य संधी

Onion MSP Demand: कांद्याला तातडीने प्रतिक्विंटल २ हजार हमीभाव, १,५०० रुपये अनुदान देण्याची मागणी

Akola Heatwave: अकोला जिल्ह्यात अति उष्णतेमुळे होरपळ

Mini kit Seeds Application: मिनीकिट बियाण्यांसाठी अर्जाचा आज शेवटचा दिवस

SCROLL FOR NEXT