Nandgaon APMC Agrowon
ॲग्रो विशेष

Nandgaon APMC : नांदगाव येथे चार हेक्टरवर उभारणार मार्केट यार्ड

Market Yard Update : सिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजार समिती नांदगाव येथे चार एकरमध्ये मार्केट यार्ड उभारणार असून चार हेक्टर जमिनीच्या खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

Team Agrowon

Sindhudurg News : सिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजार समिती नांदगाव येथे चार एकरमध्ये मार्केट यार्ड उभारणार असून चार हेक्टर जमिनीच्या खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पुढील वर्षभरात तेथे मार्केट यार्ड उभारण्याचा बाजार समितीचा प्रयत्न आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मार्केटयार्ड नसल्यामुळे हा जिल्हा पूर्णपणे भाजीपाला, विविध फळे आणि इतर सर्वच गोष्टी कोल्हापूर, बेळगाव जिल्ह्यांवर अवलंबून आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा, काजू, कोकम, नारळ, सुपारी यांसह विविध पिके घेतली जातात. याशिवाय जिल्ह्यात मासेमारी मोठ्या प्रमाणात होते. याशिवाय काही भागात भाजीपाला उत्पादन देखील घेतले जाते. परंतु शाश्वत बाजारपेठ नसल्यामुळे शेतकऱ्यांपुढे मालविक्रीचा प्रश्न होता.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेडसावणारा हा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा या हेतूने जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती गेले वर्ष दीड वर्ष जिल्ह्यात सुसज्ज मार्केटयार्ड निर्माण व्हावे यासाठी प्रयत्नशील होते.

दरम्यान, आता कणकवली तालुक्यातील नांदगाव रेल्वे स्थानकालगत बाजार समितीने चार हेक्टर जमीन खरेदी केली आहे. या चार हेक्टरमध्ये मार्केट यार्ड उभारले जाणार आहे. मार्केट यार्डचा आराखडा देखील तयार करण्यात आला आहे. या मार्केट यार्डचे लवकरच भुमिपुजन करून वर्षभरामध्ये मार्केटयार्ड उभारण्याचा बाजार समितीचा प्रयत्न आहे.

या वर्षीच्या हंगामामध्ये आंबा बागायतदारांना दलालांकडून आगाऊ रक्कम घेऊ नये. बागायदारांच्या मागणीनुसार जिल्हा बँक पतपुरवठा करेल. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डचा देखील बागायतदारांनी या वर्षीपासून फायदा घ्यावा.
मनीष दळवी, अध्यक्ष, जिल्हा बँक
नांदगाव रेल्वे स्थानक मालवाहतुकीसाठी ओळखले जाते. त्याच रेल्वेस्थानकानजीक ४ हेक्टर जागा आम्हाला मिळाली आहे. यासाठी आम्हाला जिल्हा बँकेने पतपुरवठा केला.
तुळसीदास रावराणे, अध्यक्ष, जिल्हा कृषी बाजार समिती, सिंधुदुर्ग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Minister : कृषिमंत्र्यांबाबत मंगळवारपर्यंत निर्णय; ...तर धनंजय मुंडेंना पुन्हा संधी देऊ : उपमुख्यमंत्री अजित पवार

Raigad Fruit Farming : तीन हजार हेक्‍टरवर फळ लागवड

Latur Solar Project : सौर कृषी वाहिनी योजनेत लातूरची आघाडी

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’साठी जमीन मोजणीस येणाऱ्यांना गावबंदी

Ladki Bahin Yojana: 'लाडकी बहीण' योजनेतील अपात्र महिलांची छाननी प्रक्रिया तात्पुरती स्थगित?

SCROLL FOR NEXT