APMC News : बाजार समितीने शेतकऱ्यांसाठी सुरू केली बक्षीस योजना

Maharashtra APMC Update : शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारचे उपक्रम राबवणाऱ्या येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने आता शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहनपर बक्षीस योजना सुरू केली आहे.
APMC
APMCAgrowon
Published on
Updated on

Buldana News : शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारचे उपक्रम राबवणाऱ्या येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने आता शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहनपर बक्षीस योजना सुरू केली आहे. शेतकऱ्यांनी शेतमाल अधिकाधिक प्रमाणात बाजार समितीत विक्रीस आणण्यासाठी प्रोत्साहन म्हणून हा उपक्रम सुरू करण्यात आला.

सभापती प्रसेनजित पाटील यांच्या नेतृत्वात बाजार समितीने शेतकऱ्यांसाठी आता प्रोत्साहनपर बक्षीस योजना सुरू केली. या योजनेचे कूपन ज्येष्ठ संचालक तथा शिवसेना संपर्कप्रमुख दत्ता पाटील, उपसभापती माणिकराव वाघ, सचिव प्रमोद पुदागे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

APMC
Pune APMC : पुणे बाजार समितीमधील डमी अडत्यांवर कारवाई होणार

यावेळी संचालक महादेवराव भालतडक, उल्हास माहोदे, प्रभात पाटील, नीलेश साबे, बाजार समितीचे गोविंदा वायझोळे, महादेवराव बाठे, सागर पाटील, सुपडा काटोले, पुंडलिक दातीर, संजय घाटे, कर्मचारी, व्यापारी उपस्थित होते.

APMC
APMC Latest News : बाजार समितीच्या निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनसाठी हालचालींना वेग, सरकारकडून समितीची स्थापना

शेतकऱ्यांनी आपला शेतमाल हा आसलगाव बाजार समिती यार्डामध्ये विक्रीस आणावा. किमान ३० हजार आणि त्यापेक्षा अधिक शेतमाल विक्री केलेल्या शेतकऱ्यांना दोन कूपन देण्यात येणार आहेत. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या मंगळवारी या कूपनमधून सोडत काढण्यात येणार आहे.

या सोडतीद्वारे हजारो रुपयांची ३६ विविध बक्षिसे शेतकऱ्यांना देण्यात येतील. यामध्ये प्रथम बक्षीस धान्य स्वच्छ करायचे उभे चाळणी यंत्र, द्वितीय बक्षीस मोठ्या आकाराच्या दोन ताडपत्री, तृतीय बक्षीस तीन फवारणी पंप, चतुर्थ बक्षीस दहा नग किसान टॉर्च आणि पाचवे बक्षीस २० छत्री आहेत, अशी माहिती बाजार समिती सभापती प्रसेनजीत पाटील यांनी सांिगतले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com