Jal Jivan Mission Agrowon
ॲग्रो विशेष

Water Supply : पाणीपुरवठ्याचे गणित बिघडले

Mira-Bhayndar : मिरा-भाईंदर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या स्टेम प्राधिकरण व एमआयडीसी या दोघांकडूनही मंजूर कोट्यापेक्षा कमी पाणी दिले जात आहे.

Team Agrowon

Bhayndar News : मिरा-भाईंदर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या स्टेम प्राधिकरण व एमआयडीसी या दोघांकडूनही मंजूर कोट्यापेक्षा कमी पाणी दिले जात आहे. एकीकडे शहराची लोकसंख्या वाढत असल्याने पाणी कमी पडत आहे. असे असताना दोन्ही स्त्रोतांकडून पाणीपुरवठा कमी होत असल्याने शहराच्या पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम होऊ लागला आहे.

स्टेम प्राधिकरणाकडून ८६ दशलक्ष लिटर आणि एमआयडीसीकडून १२५ दशलक्ष लिटर पाण्याचा कोटा मिरा-भाईंदरसाठी मंजूर आहे. परंतु, स्टेमकडून दररोज ७५ दशलक्ष लिटर, तर मआयडीसीकडून ११७ दशलक्ष लिटर एवढेच पाणी शहराला दिले जात आहे.

त्याचा शहरातील पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम होत असून, नागरिकांना ३६ ते ४० तासांनी पाणी मिळत आहे. भिवंडी, ठाणे व मिरा-भाईंदर या तीन महापालिकांचे मिळून स्टेम प्राधिकरण स्थापन करण्यात आले आहे. स्टेमकडून ८६ दशलक्ष लिटर पाणी मंजूर असले, तरी दररोज ८० दशलक्ष लिटर पाणी मिळणे अपेक्षित आहे.\

स्टेम, एमआयडीसीच्या शटडाऊनमध्ये टंचाई

दुसरीकडे मिरा-भाईंदरची पाण्याची स्थिती लक्षात घेऊन शहराला दररोज १२० दशलक्ष लिटर पाणी देण्याचे आदेश दोन महिन्यांपूर्वी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार मिरा-भाईंदरला केवळ एक दिवस १२० दशलक्ष लिटर पाणी मिळाले. मात्र, त्यानंतर दररोज ११७ दशलक्ष लिटर पाणीच दिले जात आहे.

स्टेम व एमआयडीसी या दोन्ही स्त्रोतांकडून दररोज सुमारे आठ ते १० दशलक्ष लिटर पाणी कमी मिळत आहे. त्यामुळे आधीच पाण्याचा तुटवडा असलेल्या शहरातील पाणीपुरवठ्याचे गणित बिघडत आहे. त्यात दोन्ही स्त्रोतांपैकी एकाने शटडाऊन घेतला, तर शहरात दोन ते तीन दिवस पाणी टंचाई निर्माण होते.

स्टेमकडून येणाऱ्या पाण्याची मोजमाप करण्यासाठी मिरा-भाईंदर महापालिकेने शहराच्या प्रवेशद्वारावर म्हणजेच चेणे येथे मीटर बसवले आहे. गेल्या महिन्याभरातील मीटरवरील पाण्याची नोंद पाहिली, तर दररोज ७४ किंवा ७५ दशलक्ष लिटर पाण्याचीच नोंद दाखवत आहे. पाणी कमी मिळत असल्याबाबत महापालिकेकडून स्टेम प्राधिकरणाला वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे पाण्याचे ऑडिट करून घेण्याच्या सूचनाही करण्यात आल्या. त्यानुसार स्टेमकडून ऑडिट करण्यात आले आहे.
- दीपक खांबीत, शहर अभियंता, मिरा-भाईंदर महापालिका
एमआयडीसी पूर्ण पाणी देत नसल्याबाबत उद्योगमंत्री उदय सामंत यांची नुकतीच भेट घेतली. येत्या काही दिवसांत दिलेल्या आदेशानुसार एमआयडीसीकडून पाणी देण्याचे आश्वासन सामंत यांनी दिले आहे. त्याचप्रमाणे स्टेमकडूनही पाणी मिळण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे.
- प्रताप सरनाईक, आमदार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Procurement Center : कोरेगावात सोयाबीन खरेदी केंद्र सुरू

Sugarcane Farming : शाहूवाडी परिसरात खुंटली आडसाली उसाची वाढ

Dairy Farming : दुग्ध व्यवसाय प्रत्येक शेतकऱ्याचा मोठा आधार

Water Crisis : ‘मोरणे’चे पात्र पडू लागले कोरडे

Achalpur APMC : अचलपूर बाजार समिती देणार व्यापाऱ्यांना ओळखपत्र

SCROLL FOR NEXT