Ujani Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Ujani Tourism : उजनी पर्यटन विकास आराखड्यासाठी सुमारे २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर

Tourism Development Plan : सोलापूर जिल्हा हा पर्यटनासाठी खूप महत्त्वाचा जिल्हा असून, येथे उजनी धरणात जल पर्यटन तसेच ९१ धार्मिक स्थळे असल्याने धार्मिक पर्यटन, जोडीला कृषी पर्यटन तसेच विनयार्ड पर्यटन विकसित करण्यात मोठी संधी आहे.

Team Agrowon

Solapur News : सोलापूर जिल्हा हा पर्यटनासाठी खूप महत्त्वाचा जिल्हा असून, येथे उजनी धरणात जल पर्यटन तसेच ९१ धार्मिक स्थळे असल्याने धार्मिक पर्यटन, जोडीला कृषी पर्यटन तसेच विनयार्ड पर्यटन विकसित करण्यात मोठी संधी आहे,

यासंबंधीचा सर्वंकष आराखडा नुकताच जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सादर केला. त्यानंतर उपमुख्यमंत्री पवार यांनी या आराखड्याला तत्वत: मान्यता देऊन यासाठी सुमारे १५० ते २०० कोटीच्या निधीची तरतूद करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

पंढरपुरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो भाविक पंढरपूर येथे येत असतात. सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिर, अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ मंदिर व कुडल- हत्तरसंग येथील संगमेश्वर मंदिर, बार्शीतील भगवंत मंदिर यांचा ही धार्मिक पर्यटन स्थळ अंतर्गत विकास केला जात असून, या ठिकाणी येणाऱय़ा भाविकांची संख्या मोठी आहे.

त्याप्रमाणेच उजनी धरण परिसर व जिल्ह्यात कृषी पर्यटनाचा लाभ घेता येऊ शकतो. यासाठी होम स्टे बैलगाडी सफारी, बफेलो राईड, स्थानिक व पारंपारिक सण साजरे करणे, लोककला, मासेमारी सह अन्य सुविधा पर्यटकांसाठी उपलब्ध करण्यात येतील. माळशिरस व करमाळा परिसरात विनयार्ड पर्यटन निर्माण केले जाऊ शकते. यामध्ये विन यार्ड, मनोरंजन, बायसिकल राईड, चीज टेस्टिंग, हॉटेल्स या सुविधा निर्माण करण्यात येतील, अशी माहिती जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिली.

२० जूनपासून होणार सर्वेक्षण

उजनीच्या सर्वेक्षणास २० जून पासून सुरवात होणार आहे. कृषी व विनयार्ड आराखडा ३० जुलै रोजी तयार होईल. प्रकल्प अहवाल व अंतिम सादरीकरण १५ ऑगस्ट २०२४ रोजी होणार आहे. त्यानंतर साधारणतः एक ते दीड महिन्यात प्रकल्पाला राज्य शिखर समितीची मान्यता मिळून पुढील काळात लवकरच या प्रकल्पाचे काम सुरू होईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rakesh Tikait: महाराष्ट्रातील एकाही शेतकऱ्याच्या जमिनीचा लिलाव होऊ देणार नाही

Contractual Workers: कंत्राटी साखर कामगारांना कायम केल्यास स्थैर्य 

Natural Farming: शाश्वत जीवनशैलीसाठी नैसर्गिक शेती आवश्यक

Urea Supply: राज्यात युरियाचा पुरवठा तातडीने करा: कृषिमंत्र्यांकडून केंद्राला पत्र

Crop Loss: पावसामुळे भिजून कोथिंबीर मातीमोल

SCROLL FOR NEXT