Anti Corruption Department Agrowon
ॲग्रो विशेष

Anti-corruption Department : दोन लाखांची लाच मागणाऱ्या मंडलाधिकारी, तलाठ्यावर गुन्हा

Bribe Arrest Update : लाचेची मागणी केल्याप्रकरणी उत्तर सोलापूर तहसील कार्यालयातील एका मंडल अधिकाऱ्यासह तलाठ्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.

Team Agrowon

Solapur News : संगणकीकरणामुळे जागेचा बंद झालेला सात-बारा उतारा मिळण्याकरिता तहसील कार्यालयात प्रस्ताव सादर करण्यासाठी चार लाख रुपयांची लाच मागितली आणि त्यातील दोन लाख रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारण्यास संमती देऊन त्यानुसार लाचेची मागणी केल्याप्रकरणी उत्तर सोलापूर तहसील कार्यालयातील एका मंडल अधिकाऱ्यासह तलाठ्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.

संदीप भीमराव लटके असे संशयित लाचखोर मंडल अधिकाऱ्याचे नाव आहे. तो उत्तर सोलापूर तहसील कार्यालयाअंतर्गत सोरेगाव महसूल मंडलात नेमणुकीस आहे. तर त्याचा साथीदार पवनकुमार मोहनराव चव्हाण हा तलाठी त्याच्याच नियंत्रणाखालील नेहरूनगर सज्जावर नेमणुकीस आहे.

या दोघांविरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल झाला आहे. यातील तक्रारदार पर्यवेक्षक म्हणून सेवेत असलेल्या एका कंपनीच्या मालकीचा ८६.६७ आर क्षेत्रफळ आकाराचा भूखंड शहरातील विजापूर रस्त्यावर नेहरूनगर भागात आहे. महसूल प्रशासनात झालेल्या संगणकीकरणामुळे या भूखंडाचा सात-बारा उतारा बंद झाला नव्हता. हा सात-बारा उतारा पुन्हा सुरू करण्याच्या अनुषंगाने महसूल अधिनियम कलम १५५ अंतर्गत उत्तर सोलापूर तहसील कार्यालयात प्रस्ताव सादर करायचा होता.

या कामासाठी मंडल अधिकारी संदीप लटके व तलाठी पवनकुमार चव्हाण या दोघांनी मिळून तक्रारदाराकडे सहा लाख रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती चार लाख रुपयांची लाच देण्याचे ठरले. त्याचा पहिला हप्ता दोन लाख रुपये स्वीकारण्यासाठी लटके व चव्हाण यांनी संमती देऊन लाचेची मागणी केली.

याबाबत तक्रारदाराने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार लाचेच्या मागणीबाबत पडताळणी केली असता, लाच मागणीचा प्रकार उजेडात आला. पोलीस अधीक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक यांच्यासह शिरीषकुमार सोनवणे, अतुल घाडगे, सलीम मुल्ला, स्वामीराव जाधव या पोलीस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT