Bribe Case Kolhapur agrowon
ॲग्रो विशेष

Bribe Case Kolhapur : सातबाऱ्यावर नाव लावण्यासाठी १५ हजारांची मागितली लाच, पंटरला अटक

Kolhapur Bribe : सातबारापत्रकी नोंद करून सातबारा देण्यासाठी पंटर पाटील याने तक्रारदाराकडे २० हजार रुपयांची मागणी केली होती.

sandeep Shirguppe

Bribe Case Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्याच्या पन्हाळा तालुक्यातील माले येथील खरेदी जमिनीची सातबारा पत्रकी नोंद करण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी कोडोलीचे मंडल अधिकारी अभिजित नारायण पवार (रा. व्हिक्टर पॅलेसजवळ, रुक्मिणीनगर, कोल्हापूर) याच्याविरोधात कोडोली पोलिस ठाण्यात काल (ता.३१) गुन्हा दाखल झाला. या प्रकरणी पंटर रणजित ऊर्फ आप्पा आनंदराव पाटील (रा. कोडोली) याला अटक करण्यात आली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक श्रीमती आसमा मुल्ला यांनी याबाबत कोडोली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या संदर्भात दिलेली माहिती अशी यातील तक्रारदाराचे काका यांनी माले येथे शेतजमीन घेतली होती. त्याची सातबारापत्रकी नोंद करून सातबारा देण्यासाठी पंटर पाटील याने तक्रारदाराकडे २० हजार रुपयांची मागणी केली होती.

यामध्ये तक्रारदार पंटर रणजित व मंडल अधिकारी अभिजित पवार यांच्यात १५ हजार रुपये तडजोडीची रक्कम ठरली होती. ही रक्कम पाटीलकडे देण्यास मंडल अधिकारी पवार यांनी सांगितल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदभनि तक्रारदाराने १२ डिसेंबर २०२३ रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती त्याची १३ डिसेंबर २०२३रोजी पडताळणी करण्यात आली.

गेले पाच महिने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कारवाईसाठी प्रयत्न सुरू होते. पाच महिन्याने कारवाईला यश आले आहे. मंडल अधिकारी पवार यास अद्याप अटक झालेली नाही. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक आसमा मुल्ला, सहायक निरीक्षक प्रकाश भंडारे, हवालदार अजय चव्हाण, सुधीर पाटील यांनी कारवाई केली. पोलिस निरीक्षक बापूसाहेब साळुंखे तपास करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fish Transport Technology: जिवंत माशांच्या वाहतुकीसाठी स्मार्ट कॅरी बॅग

Dam Storage: अकोला, बुलडाण्यातील प्रकल्प तुडुंब

Khandesh Heavy Rain: खानदेशात २५ हजार हेक्टरवरील पिकांची वाताहत

Water Conservation: लोकसहभागातून जलसमृद्ध गावाची लोक चळवळ व्हावी

Solapur Heavy Rain: सोलापुरात आठ मंडलांत अतिवृष्टी,सोयाबीनसह तूर, उडदाचे नुकसान

SCROLL FOR NEXT