Horticulture Scheme  Agrowon
ॲग्रो विशेष

Horticulture Loan : आशियायी बॅंकेकडून फलोत्पादनासाठी ९८ दशलक्ष डॉलर्सचे कर्ज मिळणार

Fruit Orchard Cultivation : फलोत्पादक शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणारे अत्याधुनिक लागवड सामग्री प्रकल्प उभारण्यासाठी आशियायी विकास बॅंकेने ९८ दशलक्ष डॉलर्सचे (८१६ कोटी ८७ लाख ९ हजार रुपये) कर्ज मंजूर केले आहे.

मनोज कापडे

Pune News : फलोत्पादक शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणारे अत्याधुनिक लागवड सामग्री प्रकल्प उभारण्यासाठी आशियायी विकास बॅंकेने ९८ दशलक्ष डॉलर्सचे (८१६ कोटी ८७ लाख ९ हजार रुपये) कर्ज मंजूर केले आहे. यातून देशभरात आकाराला येणाऱ्या सहा केंद्रांमधून राज्यात देखील एक केंद्र आकाराला येणार आहे.

केंद्र सरकारने यापूर्वीच आत्मनिर्भर गुणवत्तापूर्ण लागवड सामग्री (क्लीन प्लान्ट प्रोग्रॅम-सीपीपी) कार्यक्रमाची घोषणा केली आहे. आशियाई बॅंक याच कार्यक्रमाला थेट अर्थपुरवठा करणार आहे. देशातील खासगी रोपवाटिकांमधून कीड-रोगमुक्त लागवड सामग्री खरेदी करण्यास करण्यास फलोत्पादक शेतकऱ्यांना प्राधान्य द्यावे, हा मुख्य हेतू या कार्यक्रमाचा आहे.

आशियायी बॅंकेच्या म्हणण्यानुसार, भारतीय शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यात उच्च मूल्य व पोषण क्षमता असलेल्या फलोत्पादनाचा मोठा वाटा आहे. जगाच्या फलोत्पादन क्षेत्रात अव्वल श्रेणीत पोहोचलेल्या भारताला येथील शेतकऱ्यांची उत्पादकता वाढविण्यासाठी प्राधान्य देणे महत्त्वाचे मानले जाते. लागवड सामग्री व्यवस्थापनातून उत्पादकता वाढू शकते. हवामान बदलामुळे वाढते तापमान कीडरोगाला पोषक ठरते आहे. त्यामुळेच बॅंकेच्या मदतीतून देशात सहा नवी केंद्रे उभारली जाणार आहेत.

या प्रकल्पातून तयार होणाऱ्या सहा केंद्रांपैकी एक केंद्र महाराष्ट्रात असेल. त्यासाठी यापूर्वी एक बैठकदेखील राज्यात घेण्यात आली. केंद्रासाठी राज्यात ५० एकर जागा शोधण्याची सूचना भारतीय कृषी संशोधन परिषदेने (आयसीएआर) केली आहे. त्यानुसार, विविध भागांमध्ये जागांचा शोध सुरू आहे. राज्याच्या फलोत्पादन विभागाने या घडामोडींचे स्वागत केले आहे.

राज्याच्या फलोत्पादन विभागाने आशियायी बॅंकेच्या कर्ज घोषणेचे स्वागत केले आहे. यापूर्वी याच बॅंकेच्या राज्यात एक हजार कोटी रुपये खर्चाचा ‘महाराष्ट्र अॅग्रिबिझिनेस नेटवर्क’ (मॅग्नेट) प्रकल्प राबविण्यासाठी कर्ज मंजूर केले होते.

यामुळे राज्यात डाळिंब, केळी, संत्रा, मोसंबी, सीताफळ, पेरू, चिकू, स्ट्रॉबेरी, भेंडी व मिरची आणि फूल पिकांच्या मूल्य साखळ्या विकसित करण्यासाठी प्रकल्प राबवले जात आहेत. आता लागवड साहित्य विकासासाठी आशियायी बॅंकेने कर्ज मंजूर केल्यामुळे भविष्यात राज्यातील फलोत्पादक शेतकऱ्यांना उच्च दर्जाची कलमे, रोपे मिळू शकतील, अशी अपेक्षा कृषी विभागाला आहे.

- कर्ज कशासाठी ः

हवामान बदलाच्या संकटातही तोंड देणारे उच्च दर्जाचे प्रमाणित व कीड-रोगमुक्त लागवड साहित्य तयार करण्यासाठी.

- सहा केंद्रे काय करणार ः देशात उच्च तंत्रज्ञानाच्या प्रयोगशाळांची उभारणी. त्यामुळे तज्ज्ञांची नियुक्ती.

- प्रयोगशाळांमधील तज्ज्ञांची वैशिष्ट्ये ः गुणवत्तापूर्ण लागवड सामग्री तयार करण्याच्या पध्दतींचे ते जाणकार असतील. अशा सामग्रीचे तपासणी निकष तयार करण्यात कसब या तज्ज्ञांकडे असेल.

- या प्रकल्पाचा राज्याला नेमका होणारा लाभ ः गुणवत्तापूर्ण लागवड सामग्री तयार करणारे अत्याधुनिक एक केंद्र राज्यात तयार होणार आहे. त्यासाठी ५० एकर जागेची पाहणी सुरू.

आशियायी विकास बॅंकेने अर्थसाह्य देण्याची केलेली घोषणा राज्याच्या फलोत्पादन व्यवस्थेला बळकटी देणारी ठरेल. या प्रकल्पाचा भाग राज्यात राबविण्यासाठी अत्यावश्यक ठरणारी मदत मिळवून देण्यासाठी आमची फलोत्पादन यंत्रणा तत्पर राहील.
- डॉ. कैलास मोते, कृषी संचालक, फलोत्पादन विभाग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT