Kolhapur Sugar Industries : कोल्हापूर जिल्ह्यातील २३ साखर कारखान्यांनी ४ फेब्रुवारीअखेर ९८ लाख ३५ हजार ८७३ मे. टन उसाचे गाळप केले. तर १ कोटी ८ लाख ८७ हजार २४१ क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन घेतले आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा सरासरी साखर उतारा ११.११ आहे.
साखर सहसंचालक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, हुपरीच्या जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याने १० लाख ६८ हजार ९०० मे. टन उसाचे गाळप करून आघाडी घेतली आहे. याचबरोबर तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याने ९ लाख ४ हजार २५ मे. टन तर शिरोळच्या दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याने ७ लाख ८४ हजार २१० मे. टन उसाचे गाळप केले आहे.
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांमुळे यंदाचा गाळप हंगाम १५ दिवस उशिराने सुरु झाला. बहुतांश साखर कारखान्यांचे मालक विधानसभेच्या रिंगणात असल्याने २५ नोव्हेंबरपासूनच खऱ्या अर्थाने जिल्ह्यातील साखर कारखाने सुरू झाले. कोल्हापूर जिल्ह्यात १६ सहकारी व ७ खासगी असे एकूण २३ साखर कारखाने सुरू आहेत.
गाळप हंगामातील अडीच महिन्यांच्या कालावधीत १६ सहकारी साखर कारखान्यांनी ७२ लाख ७३ हजार १०५ मे. टन उसाचे गाळप करून ८१ लाख ११ हजार ७९४ क्विंटल साखर पोती उत्पादित केली आहेत. ७ खासगी कारखान्यांनी २५ लाख ६२ हजार ७६८ मे. टन उसाचे गाळप करून २७ लाख ७५ हजार ४४७ क्विंटल साखर पोती उत्पादित केली.
साखर कारखान्यांनी केलेले उसाचे गाळप व झालेले साखर उत्पादन
कारखान्याचे नाव (केलेले गाळप मे. टनात) (झालेले साखर उत्पादन क्विंटलमध्ये) : जवाहर हुपरी (९१०,६८,९००)(१२,५१,८००), तात्यासाहेब कोरे वारणा (९,०४,०२५) (१०,१०,०४०), दत्त शिरोळ (७,८४,२१०)(८,१६,९९०), दालमिया आसुर्ले पोर्ले (७,१४,०५०) (८,२१,८५०), शाहू कागल (५,३९,९८०) (४,९८,३००), दूधगंगा बिद्री (५,३२,७१५) (६,५०,०५०), रेणुका शुगर्स पंचगंगा (४,८२,२४०) (६,०१,१२०), सरसेनापती संताजी घोरपडे (४,१०,७७०)(३,४७,६२०), ओलम ग्लोबल ॲग्री (४,०१,२६९) (४,०७,९५०), डी. वाय. पाटील, असळज (३,९०,८४०) (३,७५,६५०), अथणी शुगर्स, बांबवडे (३,८६,१८६) (३,९५,०३०).
गुरुदत्त शुगर्स, टाकळीवाडी (३,५०,०८०) (३,९४,८३०), कुंभी-कासारी, कुडित्रे (३,४५,४८०) (४,२१,०३०), अथर्व-दौलत, हलकर्णी (३,३२,३१०) (३,६३,१७०), शरद, नरंदे (३,१५,६५०) (३,६३,९५०), भोगावती, परिते (२,९१,३४०) (३,५१,७३०), अथणी शुगर, तांबाळे (२,७७,५७०) (३,१७,४९०) इको केन एनर्जी, म्हाळुंगे (२,५३,५९०) (२,९८,७००), मंडलिक, हमिदवाडा (२,५१,८४०) (२,७४,३००), आजरा, गवसे (२,४७,२६०) (२,८८,१६४), राजाराम, कसबा बावडा (२,४३,९००) (२,७६,८२०), आप्पासाहेब नलवडे, गडहिंग्लज (१,५६,२३०) (१,७३,६५०), ओंकार शुगर, फराळे (१,५५,४३९) (१,८७,००७).
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.