Maharashtra Sugar Industry: राज्यात कारखान्यांचा पट्टा पडू लागला

Sugarcane Crushing Season: फेब्रुवारीच्या पहिल्याच सप्ताहात राज्यातील नऊ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम बंद केले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील सात साखर कारखान्यांचा हंगाम संपला आहे. नांदेडमधील २ कारखानेही बंद झाले आहेत.
Sugar Season Maharashtra
Sugar Season Maharashtraagrowon
Published on
Updated on

Kolhapur News: फेब्रुवारीच्या पहिल्याच सप्ताहात राज्यातील नऊ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम बंद केले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील सात साखर कारखान्यांचा हंगाम संपला आहे. नांदेडमधील २ कारखानेही बंद झाले आहेत. उणे पुरे दोन ते सव्वा दोन महिनेच हे कारखाने चालले आहेत.

पश्‍चिम महाराष्ट्र वगळता नजीकच्या काळात फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत बहुतांशी कारखाने बंद होण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा ऊस हंगाम लवकर संपण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे.

Sugar Season Maharashtra
Sugar Production: साखर उत्पादनात घसरण सुरूच! जानेवारीअखेर १६५ लाख टन उत्पादन

येत्या महिन्याभरात राज्यातील ७० टक्के ऊस हंगाम संपेल असा अंदाज कारखाना प्रतिनिधींचा आहे. विशेष म्हणजे यंदा निवडणुकीमुळे हंगाम लांबल्यानंतरही फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात नऊ कारखाने बंद झाले आहेत. यामुळे साखर उत्पादन घटीची शक्यता गडद झाली आहे.

गेल्या वर्षी अवर्षणामुळे अनेक ठिकाणी ऊस लागवड करण्यात आली नव्हती. याचा फटका यंदाच्या हंगामावर प्रामुख्याने दुष्काळी भागात दिसून येत आहे. सोलापूरसारख्या राज्यातील सर्वोच्च साखर कारखाने असणाऱ्या जिल्ह्यांमध्येही साखर हंगाम गतीने संपत असल्याचे चित्र आहे. लागवडी कमी असल्याने सोलापूर विभागातील अंतिम टप्प्यात उसाची चणचण भासत आहे. यंदा सोलापूर जिल्ह्यात खोडव्याचे प्रमाण जास्त आहे व उताराही कमी असल्याने तोडी जलद झाल्या. त्याचा परिणाम या जिल्ह्यातील हंगाम लवकर संपल्यावर होत आहे.

Sugar Season Maharashtra
Sugar Industry: साखरपेरणीची कडू किंमत

३ फेब्रुवारीपर्यंतच्या आकडेवारीनुसार, राज्यात ६४४ लाख टन उसाचे गाळप झाले. गेल्या वर्षी या तारखेअखेर ७२४ लाख टन ऊस तोडण्यात आला होता. नऊ टक्के साखर उताऱ्याने ५८ लाख टन साखरेची निर्मिती आतापर्यंत राज्यात झाली आहे. कोल्हापूर विभागात सर्वाधिक १०.७५ टक्के सरासरी साखर उताऱ्याने १६ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे.

पुणे विभागात ९ टक्के साखर उताऱ्याने १३ लाख टन साखरेची निर्मिती झाली. अहिल्यानगरमध्ये आठ लाख टन, तर छत्रपती संभाजीनगर विभागात सात लाख टन साखर तयार झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा चार कारखाने लवकर बंद झाले आहेत. विशेषतः दक्षिण पश्‍चिम महाराष्ट्रात अजूनही एक महिनाभर कारखाने चालतील इतका ऊस शिल्लक आहे.

कर्नाटकातील कामगार उपलब्ध होण्याची शक्यता

येत्या पंधरा दिवसांत विशेष करून पश्‍चिम महाराष्ट्रातील यंत्राने सुरू असणारी ऊसतोड बंद होण्याची शक्यता आहे. अंतिम टप्प्यात ऊस तोडणी कामगारांची गरज असल्याने सीमावर्ती भागातील कारखाने कर्नाटकातील कारखान्याच्या ऊस तोडणी कामगारांशी करार करत असल्याचे चित्र आहे. कर्नाटकातील ऊस हंगाम १५ फेब्रुवारीपर्यंत संपण्याची शक्यता आहे. यामुळे कर्नाटकातील ऊस तोडणी कामगार महाराष्ट्रातील कारखान्यांना उपलब्ध होत आहेत. हंगामाच्या अंदाजे दिवसानुसार या कामगारांशी करार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com