Kharif Sowing Agrwon
ॲग्रो विशेष

Kharif Sowing : खानदेशात ९० टक्क्यांवर पेरण्या

Kharif Season : खानदेशात मागील काही दिवस पाऊस रोज हजेरी लावत आहे. पेरण्याही यंदा ९० टक्क्यांपर्यंत जुलैच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण झाल्या आहेत.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात मागील काही दिवस पाऊस रोज हजेरी लावत आहे. पेरण्याही यंदा ९० टक्क्यांपर्यंत जुलैच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण झाल्या आहेत. पेरण्यांची गती सततच्या पावसाने काही भागात मंद झाली आहे. खानदेशात जूनअखेर सरासरी १२५ मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.

जूनमधील पाऊसमान काही भागात चांगले राहिल्याने पेरण्यांना गती आली. जूनममध्येच पेरण्या ७१ टक्क्यांवर झाल्या. तर या महिन्यात जसा वाफसा मिळाला, तशी पेरणीही झाली. मागील दोन दिवसात खानदेशात अपवाद वगळता सर्वत्र पाऊस झाला आहे. मागील दोन दिवसात कुठेही अतिवृष्टी झालेली नाही. शनिवारी (ता.५) अनेक भागात मध्यम, हलका पाऊस झाला.

जळगाव तालुक्यात २४ मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला. भडगाव, पाचोरा, धरणगाव, चोपडा या भागातही पावसाने हजेरी लावली. रविवारी दुपारी व रात्री अनेक भागात पाऊस झाला. जळगाव तालुक्यात रविवारी १६ मिलिमीटर पाऊस झाला. मागील चार ते पाच दिवसांपासून सूर्यदर्शन हवे तसे झालेले नाही. पाऊस व उकाडा अशी स्थिती आहे.

रावेर, यावल, बोदवड भागात पाऊस कमी राहिला आहे. मागील शुक्रवारपासून (ता.४) रावेर भागात अपवादानेच चांगला पाऊस झाला आहे. तसेच धुळ्यातील धुळे, नंदुरबारातील नंदुरबार भागातही पाऊस हवा तसा नसल्याची माहिती मिळाली.

सातपुड्यात पाऊसमान बरे

यंदा सातपुडा पर्वतरांगा व लगत पाऊसमान बरे आहे. नंदुरबारातील धडगाव, अक्कलकुवा, तळोदा, शहादा, धुळ्यातील शिरपूर, जळगावातील चोपडा या भागात पाऊसमान बरे राहीले आहे. सातपुड्यातील शिरपुरातील अनेर, चोपड्यातील गूळ, यावलमधील मोर व गारबार्डी, रावेरातील अभोडा, मंगरूळ, सुकी आदी प्रकल्पांत जलसाठा ६० टक्क्यांवर आहे. मंगरूळ धरणातील जलसाठा ८५ टक्क्यांवर आहे.

पेरण्या पूर्णत्वाकडे

खानदेशात ९० टक्क्यांवर पेरण्या पूर्ण. कापसाची लागवड पूर्ण.

मका लागवड सुरू आहे. उडीद, मूग, तूर व सोयाबीनची पेरणीदेखील आटोपली.

बाजरी पेरणी सुरू.

जळगाव जिल्ह्यात मका पिकाची दीड लाख हेक्टरवर पेरणी पूर्ण.

कापसाची लागवड चार लाख हेक्टरपर्यंत.

जळगाव जिल्ह्यात उडदाची १२ हजार हेक्टरवर, तर मुगाची ११ हजार हेक्टरवर पेरणी.

सोयाबीनची खानदेशात सुमारे ३८ हजार हेक्टरवर पेरणी.

कापूस लागवडीत मोठी घट होण्याच्या स्थितीची शक्यता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Relief: मराठवाडा दुष्काळग्रस्त जाहीर करून तातडीने मदत द्या

Exam Stress Relief : परीक्षा जवळ आलीये अन् टेन्शन वाढलंय? 'या' सोप्या टिप्सने ताण होईल छुमंतर!

Women Farmers Contribution: मोरोक्कोच्या बहरलेल्या शेतीतील अदृश्य हात

Interview With Rakesh Kaithwas : शेतकरी कंपन्यांच्या बळकटीकरणातून मूल्यवर्धनाला चालना

Bullock Safety Tips: बैलाच्या वजनानुसार बैलगाडीत किती ऊस भरावा?

SCROLL FOR NEXT