PMKSY Agrowon
ॲग्रो विशेष

Micro Irrigation Subsidy : सूक्ष्म सिंचनाचे नऊ कोटींचे अनुदान थकित

PM Agriculture Irrigation Scheme : शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने प्रति थेंब अधिक पीक, सूक्ष्म घटकासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ठिबक, तुषार या सिंचनाच्या साधन उपलब्धीसाठी निधी उपलब्ध करून दिला जातो.

Team Agrowon

Aurangabad News : शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने प्रति थेंब अधिक पीक, सूक्ष्म घटकासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ठिबक, तुषार या सिंचनाच्या साधन उपलब्धीसाठी निधी उपलब्ध करून दिला जातो.

दरम्यान शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या मागील दोन वर्षातील सूक्ष्म सिंचनाचे अनुदान नऊ कोटी दहा लाख रुपये अद्याप थकित आहेत. याशिवाय मुख्यमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना २५ टक्के वाढीव अनुदानाची जाफराबाद तालुक्याची दोन कोटी ४८ लाख रुपये थकित असल्याने शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होत आहेत.

कृषी विभागाच्या वतीने खरीप व रब्बी हंगामात पिकांना सूक्ष्म सिंचनाद्वारे पाणी देता यावे म्हणून महाडीबीटी या कृषी विभागाच्या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज मागून लकी ड्रॉद्वारे लाभार्थी शेतकरी निवडले जातात. जाफराबाद तालुक्यामध्ये २०२२- २३ मध्ये निवडलेल्या १०५ लाभार्थी शेतकऱ्यांचे ३१ लाख ५० हजार अनुदान थकले आहे. तर २०२३- २४ या वर्षी अनुदानास पात्र ठरलेल्या २५१९ लाभार्थ्याचे आठ कोटी ७९ लाख रुपये अनुदान थकलेले आहे.

यामुळे शेतकऱ्यांना ही रक्कम त्वरित वितरित केली जावी अशी मागणी होत असली तरी २०२४ - २५ वर्ष सुरू झाले तरी अद्याप मागील अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांना प्राप्त झाली नाही. दरम्यान चालू वर्षासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी या पोर्टलवर सूक्ष्म सिंचनासाठी अर्ज सादर केलेले आहेत. परंतु शेतकऱ्यांना अद्याप पूर्वसंमती मिळालेली नाही. खरिपाची लागवड झाली तरी तुषार, ठिबक सिंचन खरेदीसाठी शेतकऱ्यांना पूर्वसंमती नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.

तालुक्यातील सूक्ष्म सिंचनाच्या थकित अनुदानासाठी कार्यालयाच्या वतीने वेळोवेळी मागणी करण्यात आलेली आहे. वरिष्ठ कार्यालयाकडून अद्याप अनुदान प्राप्त झाले नसल्याने सदर शेतकऱ्यांचे अनुदान प्राप्त होताच ते त्यांच्या खात्यात वर्ग केले जाईल.
अमोल शिंदे, तालुका कृषी अधिकारी, जाफराबाद.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT