Tembhu Irrigation Project
Tembhu Irrigation ProjectAgrowon

Agriculture Irrigation : वंचित १५०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार : कदम

Agriculture Update : उंचावरील व पाण्यापासून वंचित असलेली १५०० हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येण्यासाठी ‘टेंभू’च्या माध्यमातून १५०० हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येण्यासाठी ‘टेंभू’च्या माध्यमातून पाणी उपलब्ध होण्यासाठीही सर्वेक्षण झाले आहे. णी उपलब्ध होण्यासाठीही सर्वेक्षण झाले आहे.

Sangli News : तालुक्यातील अपशिंगे, कोतवडे, रायगाव, शाळगाव, तसेच कऱ्हाड तालुक्यातील शामगाव, पाचुंद येथील टेंभू योजनेच्या लाभक्षेत्रानजीक असलेली, परंतु उंचावरील व पाण्यापासून वंचित असलेली १५०० हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येण्यासाठी ‘टेंभू’च्या माध्यमातून पाणी उपलब्ध होण्यासाठीही सर्वेक्षण झाले आहे.

याबाबतचा प्रस्ताव जलसंपदा विभागाकडून प्रशासकीय मान्यतेसाठी शासनास सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळविण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करीत आहोत, अशी माहिती आमदार विश्वजित कदम यांनी कडेगाव येथे पत्रकारांना दिली.

Tembhu Irrigation Project
Agriculture Irrigation : शेतकऱ्यांना डिझेलसाठी मिळतंय अनुदान ; जाणून घ्या योजनेबद्दल

आमदार कदम म्हणाले, की वरील गावांमधील उंचावर असलेल्या १ हजार ५०० हेक्टर क्षेत्रास या योजनेचा लाभ होत नसल्याने पाण्यापासून वंचित शेतजमीन सिंचनाखाली येण्यासाठी व टेंभू योजनेच्या माध्यमातून पाणी उपलब्ध होण्यासाठी सातत्याने शासनस्तरावर पाठपुरावा सुरू आहे. टेंभू योजनेपासून वंचित असलेल्या या १५०० हेक्टर क्षेत्रास पाणी द्यावयाचे झाल्यास टप्पा क्र. २ प्रमाणे शिवाजीनगर (ता. कडेगाव) तलावामध्ये सोडून, तेथून १४५ मीटर उचलून स्वतंत्र उपसा सिंचन योजनेद्वारे या गावांमधील संपूर्ण क्षेत्र ओलिताखाली येण्यास मदत होणार आहे.

Tembhu Irrigation Project
Agriculture Irrigation Subsidy : ‘ठिबक’च्या अनुदानाचे सव्वा कोटी रुपये थकित

याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यापूर्वी स्वतः जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता हणमंत गुणाले, टेंभू योजनेचे कार्यकारी अभियंता राजन रेड्डीयार यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेऊन वंचित लाभक्षेत्राला पाणी देण्याबाबत संबंधित प्रस्ताव तत्काळ सादर करण्याबाबतच्या सूचना दिल्या होत्या. या क्षेत्रासाठी उपसा सिंचन योजना करणे व वितरण व्यवस्था करणे यासाठी ७१.२८ कोटी असा खर्च अपेक्षित असून त्याबाबतचा सविस्तर प्रस्ताव महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे यांच्यामार्फत १२ फेब्रुवारी २०२४ च्या पत्रान्वये मंजुरीसाठी शासनास सादर करण्यात आलेला आहे, असे आमदार कदम यांनी सांगितले.

कडेगाव तलावासाठी स्वतंत्र वाहिनीने पाणी

जिल्हा नियोजनच्या शनिवारी (ता. २२) झालेल्या बैठकीत कडेगाव तलावाकरिता स्वतंत्र जलवाहिनी करून कायमस्वरूपी पाणी देण्याची व्यवस्था करण्याबाबत आग्रही मागणी केली. त्यास अनुसरून जलसंपदा विभागाकडून सर्वेक्षण करून पुढील कार्यवाही होईल, असे आमदार विश्वजित कदम यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com