Water Shortage Agrowon
ॲग्रो विशेष

Water Shortage : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सातशे ६६ गावांमध्ये पाणीटंचाई निवारण्यासाठी ८८२ उपाययोजना

Water Scarcity : जिल्ह्यातील ७६६ गावांमध्ये पाणीटंचाई निवारण्यासाठी ८८२ उपाययोजना करण्यात आल्या. संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी ४४ कोटी रुपयांचा कृती आराखडा तयार करण्यात आला असून उपाययोजनांचा कृती आराखडा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून शासनाकडे पाठवण्यात आला.

Team Agrowon

Chh. Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर ः जिल्ह्यातील ७६६ गावांमध्ये पाणीटंचाई निवारण्यासाठी ८८२ उपाययोजना करण्यात आल्या. संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी ४४ कोटी रुपयांचा कृती आराखडा तयार करण्यात आला असून उपाययोजनांचा कृती आराखडा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून शासनाकडे पाठवण्यात आला.

जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून जानेवारीपासून जूनपर्यंतचा संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी उपलब्ध पाणीसाठा, भूजल पातळीच्या आधारे उपाययोजनांचा कृती आराखडा तयार करण्यात येतो. या वर्षी एप्रिलपासून टंचाई जाणवेल व टॅंकर सुरू करावे लागतील असा अंदाज बांधत कृती आराखडा तयार करण्यात आला. मात्र, प्रत्यक्षात मार्चमध्येच टंचाईच्या झळा जाणवू लागल्याने मार्चमध्येच टॅंकरची मागणी होऊ लागली. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी सुधारित कृती आराखडा मागितला. त्यानुसार सुधारित कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.

यानुसार छत्रपती संभाजीनगर तालुक्यांतील संभाव्य ७६ गावांमध्ये १०८ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आलेल्या आहेत. पैठण तालुक्यातील २७९ गावांत ३११, गंगापूर तालुक्यात ९३ गावांत १२०, वैजापूर तालुक्यातील ८१ गावांमध्ये ९५, कन्नड तालुक्यात ९३ गावांत ९३, खुलताबाद तालुक्यात २९ गावांत ३९, सिल्लोड तालुक्यात ५६ गावांत ५६, सोयगाव तालुक्यांत २८ गावांत २८ आणि फुलंब्री तालुक्यात ३१ गावांत ३२ अशा नऊ तालुक्यांतील ७६६ गावांमध्ये ८८२ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या.

टंचाई निवारणार्थ उपाययोजनेच्या कृती आराखड्याची दोन टप्प्यांमध्ये वर्गवारी करण्यात आली. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांसाठी एकूण २०९ गावांसाठी २५९ उपाययोजनांसाठी १७६६. ३४ लाख रुपयांची निधीची मागणी. एप्रिल ते जून या तीन महिन्यांसाठी ५५७ गावांसाठी ६२३ उपाययोजनांसाठी २६४७.७७ लाख रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली. यानुसार जानेवारी ते जून २०२५ साठी जिल्ह्यातील ७६६ गावांमध्ये संभाव्य पाणीटंचाई निवारण्यासाठी ८८२ उपाययोजनांकरिता एकूण ४४ कोटी १४ लाख ११ हजारांच्या निधीच्या मागणीचा प्रस्ताव शासनाकडे नुकताच पाठविण्यात आल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांनी सांगितले.

टंचाई निवारणार्थासाठी
निधीची गरज (रक्कम लाखात )

पैठण ६३४.६४
छत्रपती संभाजीनगर ४९२.५८
गंगापूर १८०३.६६
वैजापूर ५४८.४८
कन्नड ४८३.००
खुलताबाद १३०.४८
सिल्लोड १४०.०७
सोयगाव २७.२०
फुलंब्री १५४.००
एकूण ४४१४.११

यांचा उपाययोजनामध्ये समावेश
  विहिरींचे अधिगृहण करणे
  सार्वजनिक विहिरींचे खोलीकरण
  नवीन विंधन विहिरी खोदणे
  तात्पुरत्या नळ पाणीपुरवठा योजना
  नळ पाणीपुरवठा विशेष दुरुस्ती
  विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती
  टॅंकर सुरू करणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nanded Rain : नांदेड जिल्ह्यात संततधार

Fertilizer Mismanagement : कृषी सेवा केंद्रातील खत साठ्यात तफावत

Heavy Rain Dharashiv : धाराशिव जिल्ह्यात पावसाचा हाहाकार

AI In Agriculture : सांगली जिल्हा बँक ‘एआय’साठी देणार अनुदान

Agriculture Marketing : शेतीमाल मार्केटिंग साठी ‘कृषी-पणन’ने एकत्र यावे

SCROLL FOR NEXT