Water Scarcity : खानदेशातील पाणीटंचाई आटोक्यात, टँकरची संख्या फक्त २५

Water Tanker : खानदेशात टँकरची संख्या मार्चअखेरीस सुमारे २५ पर्यंत आहे. काही भागांत टँकरची मागणी आहे.
Water Tanker
Water Tanker Agrowon
Published on
Updated on

Jalgaon News : खानदेशात टँकरची संख्या मार्चअखेरीस सुमारे २५ पर्यंत आहे. काही भागांत टँकरची मागणी आहे. अन्यत्र टंचाईची तीव्रता नाही. जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव, अमळनेर भागात टंचाई काही भागात आहे. धुळ्यातील शिंदखेडा, साक्री, नंदुरबारातील नंदुरबार तालुक्यात काही क्षेत्रात टंचाई आहे. याच भागात टँकरची मागणी आली.

जळगाव जिल्ह्यातील जामनेर, जळगाव, पारोळा, पाचोरा आदी भागात टँकरची मागणी आलेली नाही. मागील वर्षी जळगाव जिल्ह्यात अमळनेर तालुक्यातील अनेक गावांत एप्रिल महिन्याच्या सुरवातीलाच दुष्काळाची भीषण परिस्थिती जाणवू लागली होती.

१८ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू झाला होता. प्रशासनाने २७ विहिरी अमळमेरात अधिग्रहीत केल्या. अमळनेर तालुक्यातून तापी, बोरी व पांझरा नद्या वाहतात. यंदा मात्र पाऊसमान चांगले राहील्याने अमळनेर व चाळीसगावात टँकरची संख्या वाढलेली नाही.

Water Tanker
Water Scarcity : डहाणूच्या ग्रामीण भागात पाणीटंचाई

टँकरची संख्या पुढे वाढणार

एप्रिल महिन्याच्या अखेरीस किंवा मेच्या मध्यात जळगावातील अमळनेर, चाळीसगाव, धुळ्यातील शिंदखेडा, साक्री व नंदुरबारातील नंदुरबार भागात टँकरची मागणी येवू शकते. यानंतर टँकरची संख्या वाढेल, असे संकेत आहे.

Water Tanker
Water Scarcity : लोक सहभागातूनच पाणीटंचाईवर मात शक्य

प्रकल्पांचा आधार

चाळीसगावात मन्य़ाड, गिरणा व अन्य लहान तलाव, लघु प्रकल्पांमुळे दिलासा मिळाला आहे. नंदुरबार व साक्रीतही बुराई व अन्य लहान तलाव, प्रकल्पांमधील जलसाठ्यामुळे टंचाई वाढलेली नाही. अमळनेरात तापी नदीवरील निर्माणाधिन असलेला पाडळसरे प्रकल्प अपूर्ण आहे. यामुळे टंचाई असते. तसेच अन्य एकही सिंचन प्रकल्प तालुक्यात नाही. बोरी व पांझरा नदीवर साठवण व केटी वेअर बंधारे असल्याने त्यातील पाण्याने दिलासा मिळत आहे. अनेक बंधारे भरले होते. त्यात या महिन्यातही पाणी टिकून राहिले.

ही गावे टंचाईसदृश स्थितीत

अमळनेरातील निसर्डी, लोणपंचम, शिरसाळे, तळवाडे, नगाव, आर्डी-अनोरे, लोण बुद्रूक, नगाव खुर्द, देवगाव देवळी, पिंपळे खुर्द व चिमनपुरी, डांगर बुद्रुक, भरवस, अंचलवाडी, आटाळे, सबगव्हाण, लोणचारम तांडा, पिंपळे बुद्रूक व गलवाडे बुद्रूक ही गावे टंचाईग्रस्त असतात. या भागात खडकाळ जमीन आहे. भूगर्भात पाणी फारसे नाही. यामुळे पाऊस असतानाही टंचाईची समस्या असते. या गावांबाबत प्रशासन खबरदारी घेत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com