Cotton Seeds Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Seeds Price : कपाशी बियाणांच्या सर्वच वाणांचे ८६४ रुपये दर

Cotton Update : आगामी खरीप हंगामासाठी शासनाने हायब्रीड कपाशी बीजी टू वाणांचे दर जाहीर केले आहेत.

Team Agrowon

Nanded News : आगामी खरीप हंगामासाठी शासनाने हायब्रीड कपाशी बीजी टू वाणांचे दर जाहीर केले आहेत. प्रति पाकीट ८६४ रुपयाने विक्री करण्याचे निर्देश शासनाकडून मिळाल्यामुळे कृषी निविष्ठा विक्रेत्याकडून करून अधिक दराने कपाशी बियाणाची विक्री होत असल्यास कृषी विभागाकडे तक्रार करण्याचे आवाहन कृषी विभागाच्या जिल्हा गुणनियंत्रण शाखेकडून केले आहे.

आगामी खरीप हंगामात जिल्ह्यात दोन लाख दहा हजार हेक्टरवर कपाशीची लागवड होण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. यानुसार जिल्ह्याला लागणाऱ्या साडेदहा लाख कपाशी पॉकेटचे नियोजन करण्यात आले आहे. विविध बियाणे उत्पादक कंपन्यांकडूनही जिल्ह्याच्या ठोक विक्रेत्यांकडे सध्या कपाशी बियाणे पुरवठा होत आहेत.

परंतु काही ठराविक कपाशी वाणांना अधिकचे रुपये दराने विक्री होत असल्याच्या तक्रारी मागील अनेक दिवसांपासून येत होत्या. यामुळे केंद्र शासनाने कपाशी बीजी टू या हायब्रीड वाणांच्या शेतकऱ्यांना विक्रीचे दर ता. सात जूनच्या राजपत्रात जाहीर केले आहेत. यानुसार आता शेतकऱ्यांनी सर्वच प्रकारच्या कपाशी बियाणांसाठी अधिकचे पैसे मोजण्याची गरज नाही.

शासनाच्या निर्देशानुसार कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी प्रति पॉकिट ८६४ दराने विक्री करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे कृषी विभागाच्या जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक शाखेकडून शेतकऱ्यांना कपाशी बियाणे ८६४ दरानेच विकत घेण्याचे आवाहन केले आहे. या दरापेक्षा अधिक दराने बियाणे विक्री करत असलेल्या कृषी निविष्ठा विक्रेत्यांची तक्रार संबंधित कृषी सहायक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे लेखी स्वरूपात करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.

बियाणे विक्रेत्यांनी कपाशी बियाणे ८६४ रूपयापेक्षा जास्त दराने विक्री करू नये. जास्त दराने विक्री केल्याने कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.
बी. बी. गिरी, जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक, नांदेड.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Middle East War: युद्ध नको, बुद्ध हवा

Livestock Entrepreneurship Scheme: पशुधन उद्योजकता योजनेत आता वराहपालनचा समावेश

Mango Pulp Seized: भेसळयुक्त आंब्याचा गर नष्ट

Farmer Protest: आंबा पीक नुकसानभरपाईचा लाभ कोकणाप्रमाणे द्यावा

Konkan Krushi Vidyapeeth: कोकण कृषी विद्यापीठाला ‘ए’ दर्जाचे मानांकन

SCROLL FOR NEXT