Water Crisis  Agrowon
ॲग्रो विशेष

Marathwada Water Issue : जायकवाडीत सोडणार ८.६० टीएमसी पाणी

Jaykwadi Dam : जायकवाडी प्रकल्प गतवर्षी ऑक्टोबर अखेरीस शंभर टक्के भरला होता. यंदा मात्र केवळ ४५.८९ टक्के आहे. म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत निम्मादेखील साठा नाही.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar News : जायकवाडी प्रकल्प गतवर्षी ऑक्टोबर अखेरीस शंभर टक्के भरला होता. यंदा मात्र केवळ ४५.८९ टक्के आहे. म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत निम्मादेखील साठा नाही. यामुळे अनेक मागण्यानंतर जायकवाडीच्या उर्ध्व भागातील धरणसमूहातून मराठवाड्यासाठी हक्काचे पाणी सोडण्याबाबतचे आदेश सोमवारी (ता. ३०) देण्यात आले आहेत.

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाकडून जायकवाडी धरणात वरच्या भागातून ८.६० टीएमसी पाणी सोडण्याबाबतचे आदेश काढण्यात आले आहेत. या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करण्याचे यात म्हटले आहे.

मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पात ५२ टक्के पाणीसाठा आहे. सीना कोळेगाव प्रकल्पात तर काहीच उपयुक्त पाणीसाठा नाही. १५ ऑक्टोबरपूर्वी वरच्या धरणातून समन्यायी पद्धतीने मराठवाड्याच्या हक्काचे पाणी सोडण्यात यावे, अशी आग्रही मागणी मराठवाडा पाणी परिषदेकडून सातत्याने करण्यात आली.

या मागणीसाठी पाणी परिषदेच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयापुढे एक दिवसाचे उपोषण करण्यात आले होते. जर हक्काचे पाणी तातडीने सोडले नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला होता.

कोणत्या धरणसमूहातून येणार किती पाणी

धरणसमूह एवढे येणार पाणी (टीएमसी)

मुळा (मांडओहोळ, मुळा) प्रवरा (भंडारदरा, निळवंडे, २.१०

भोजापूर, आढळा) गंगापूर (गंगापूर, काश्यपी, ३.३६

गौतमी गोदावरी) गोदावरी दारणा (आळंदी, कडवा, ०.५

भाम, भावली, वाकी, दारणा, मुकणे, वालदेवी) २.६४३

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gharkul Yojana : ग्रामीण भागातील घरकुलांना शहरीप्रमाणे निधी द्या

Women Entrepreneur : महिला उद्योजकांनी विक्री व्यवस्था उभारणे आवश्यक ः आवटे

Soybean Procurement : सोयाबीन खरेदीला धाराशिवमध्ये वेग

Mahayuti Press Conference : महाराष्ट्रातील हा ऐतिहासिक विजय असून लाडक्या बहिणींनी अंडरकरंट दिला; महायुतीच्या पत्रकार परिषदेतून शिंदे, फडणवीस, अजित पवार यांची मविआवर टीका

Onion Cultivation : एक लाख हेक्टरपर्यंत पोहोचले कांदा लागवड क्षेत्र

SCROLL FOR NEXT