Raising Chickens Agrowon
ॲग्रो विशेष

Chicken Rate : आठवडी बाजारात एक किलो कोंबड्याचा भाव ८५० ते ९०० रुपये?

आठवडी बाजारावर हातावरील पोट असणारे अनेक छोटे व्यापारी आहेत. ते व्यापारी आठवडी बाजारात सकाळी लवकर जाऊन शेतकऱ्यांकडून शेतमाल, शेळ्या, कोंबड्या खरेदी करणे आणि पूर्ण बाजार भरला असता, १०० ते २०० रुपये नफा घेऊन विकणे. आशा दोन्ही घटकांमुळे भाववाढ झालेली आहे.

डॉ. सोमिनाथ घोळवे

आकाढी (आषाढी) चालू आहे, गावातील ग्राम देवाच्या (दैवताच्या) यात्रेचे दिवस. त्यात आज रविवारी नेकनूर (ता.जि. बीड) येथील आठवडी बाजार. या बाजारातून बोकड-कोंबडे आणून देवाच्या नावाने कापून पाहुणचार केला जातो.

त्यामुळे उत्साहाने मी आज संध्याकाळी घरी फोन केला असता, यात्रेविषयी विचारले. त्यावर वडील आणि मोठा भाऊ सांगू लागले की, "मंगळवारी आपणही यात्रा करणार आहोत. त्यासाठी कोंबडे आणायला नेकनूरच्या बाजाराला गेलो होतो. पण कोंबड्याचे भाव पाहून घेतले नाहीत".

मी म्हणालो, "काय भाव होते?. कोणते कोंबडे होते"? (गावरान की बॉयरल)

त्यावर भाऊ सांगू लागला, "साधारणपणे गावरान वजा होते, अंदाजे किलोभर भरेल अशा कोंबड्याचा भाव ८५० ते ९०० रुपये सांगत होते. खूपच महाग झाल्याने घेतले नाहीत".

मी म्हणालो, "ठीक आहे. श्रावण महिना झाल्यावर यात्रा करा. त्यावेळी कोंबड्या स्वस्त होतील. आता बोकडाच्या मटनाचा पाहुणचार करा".

सांगण्याचे तात्पर्य असे की कोंबड्या पालन (गावरान, घरगुती फिरत्या कोंबड्या पालन व्यवसाय) व्यवसाय हा शेतीला जोड व्यवसाय ग्रामीण भागात केला जातो. त्या व्यवसायाला चांगले दिवस आले का? हा प्रश्न आहे. याचे उत्तर काही प्रमाणात होय म्हणावे लागेल. कारण बॉयलर कोंबड्याच्या तुलनेत गावरान कोंबड्याला भाव जास्त आहे. किंबहूना बोकडाच्या मटनापेक्षा जास्त भाव असल्याचे पाहण्यास मिळते.

दुसरे, श्रावण महिना सुरु होण्यास १० दिवस बाकी आहे. त्यात या वर्षी अधिकचा महिना आला आहे. त्यामुळे पुढील दोन महिने मांसाहार करता येणार नाही. त्यामुळे कोंबड्याना मागणी वाढलेली आहे.

तिसरे, आठवडी बाजारावर हातावरील पोट असणारे अनेक छोटे व्यापारी आहेत. ते व्यापारी आठवडी बाजारात सकाळी लवकर जाऊन शेतकऱ्यांकडून शेतमाल, शेळ्या, कोंबड्या खरेदी करणे आणि पूर्ण बाजार भरला असता, १०० ते २०० रुपये नफा घेऊन विकणे. आशा दोन्ही घटकांमुळे भाववाढ झालेली आहे.

बॉयरल कोंबड्या पेक्षा गावरान कोंबड्या पाळणाऱ्या व्यवसायाला चांगले दिवस आहेत. गावरान कोंबड्याचे वैशिष्टे असे की कोंबड्यांच्या सामान्य रोगांच्या विरोधात उत्तम प्रतिकार क्षमता आणि मुक्त संख्येत संगोपनासाठी जुळवून घेण्यास सक्षम असून चवीला अतिशय चवदार असतात. नियमित आहार व्यवस्थेत नर कोंबडे वयाच्या ८ व्या आठवड्यांत मध्यम शरीराचे वजन गाठतात. तर मादी एका अंडी चक्रात जास्त प्रमाणात अंडी देतात. गावरान कोंबड्याचे अंडी १२ ते १५ रुपये एक नग आहे.

अलीकडे गावरान कोंबड्या ग्रामीण भागात अपवाद वगळता सापडत नाहीत. बालाघाट परिसरात काही कुटुंबाने गावरान कोंबड्या जतन केल्या आहेत, मात्र त्यांचे जिवंत कोंबडी-कोंबड्याचे दर ७०० रुपये किलोपेक्षा जास्त आहेत. (आकाढीमुळे हे दर खूपच वाढलेले आहेत) पण विक्रीसाठी उपलब्ध नाही असेच चित्र. गाव यात्रेत किंवा आमच्याकडील आकाढी (आषाढी) यात्रेत गावरान कोंबड्या मिळत नसल्याने विलायती कोंबड्या देवाच्या नावाने कापल्या जातात. देवानेही हे स्वीकारले आहे असं वाटतं.

(टीप: माझा या यात्रेला पाठिंबा आहे. मात्र यात्रेत देवाच्या नावाने कोंबड्या, बोकड कापण्याचे समर्थन देत नाही. )

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gram Panchayat Reservation: ग्रा. पं. सदस्यांच्या आरक्षण सोडतीला लागला मुहूर्त

Nilesh Lanke Demands: पेट्रोल व्हॅट, सरचार्ज रद्द करून जनतेला दिलासा द्या : लंके

Solapur Gram Panchayat Reservation: सोलापुरातील ७०१ ग्रामपंचायतींच्या आरक्षणाची सोडत १२ जूनला

Satara Gram Panchayat Reservation: साताऱ्यातील ग्रामपंचायतींच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

Cotton Farming: अमरावती विभागात अतिसघन कापसावर भर

SCROLL FOR NEXT