Gram Panchayat Elections: राज्यातील मुदत संपलेल्या (२०२४ व २०२५) तसेच २०२६ मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून, ग्रामपंचायत सदस्यांच्या प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत येत्या १२ जून रोजी काढण्यात येणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील १ हजार २७ ग्रामपंचायतींपैकी तब्बल ७०१ ग्रामपंचायतींचा या प्रक्रियेत समावेश आहे..आरक्षण प्रक्रियेमुळे ग्रामीण भागातील राजकारण ढवळून निघण्याची चिन्हे आहेत. सरपंचांची निवड थेट जनतेतून होणार असली, तरी गावपातळीवर पॅनेल राजकारणाला अद्याप महत्त्व आहे. कोणत्या प्रभागात कोणते आरक्षण लागू होणार आणि कोणत्या कार्यकर्त्याला संधी मिळणार, याकडे गावपुढाऱ्यांचे लक्ष लागले आहे..Gram Panchayat Elections: पावणेआठशे ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या हालचाली सुरू.जिल्हा प्रशासनाने प्रभागरचना अंतिम केली असून, आरक्षण प्रक्रिया १० जुलैपर्यंत पूर्ण होणार आहे. त्यानंतर मतदार यादी विभाजनाचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दिवाळीच्या सुमारास ग्रामपंचायत निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे..Food Processing Industry: सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगात कोल्हापूर, अहिल्यानगर अव्वल....असे आहे आरक्षण सोडतीचे वेळापत्रक८ जून : ग्रामसभेची अधिसूचना प्रसिद्ध१२ जून : विशेष ग्रामसभा व आरक्षण सोडत१९ जून : प्रभागनिहाय प्रारूप आरक्षण प्रसिद्ध.१९ ते २५ जून : हरकती व सूचना नोंदविण्याची मुदत३ जुलै : हरकतींवर प्रांताधिकाऱ्यांचा अभिप्राय१० जुलै : अंतिम प्रभाग आरक्षण प्रसिद्ध.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.