Chicken Rate : उन्हाळ्यात देशातील चिकनचे भाव वाढलेले दिसतात. उन्हामुळे उत्पादनावर परिणाम होत असतो. यामुळे दर वाढतात. पण यंदा दरात झालेली वाढ जास्त आहे. सध्या देशातील वेगवेगळ्या भागात चिकनची किरकोळ विक्री २८० ते २३० रुपये प्रतिकिलोने होत आहे.
देशात वर्षाला ४० लाख टन चिकनचे उत्पादन होते. याचे मुल्य जवळपास १ हजार ८५० कोटी रुपये असते. देशाच्या एकूण मांस उत्पादनात चिकनाचा वाटा ५० टक्के एवढा आहे.
उन्हाळ्यात तापमान जास्त असते. उष्णतेत अचानक चढ उतार होत असतात. त्यामुळे पिलांची मर जास्त होते. त्यामुळे शेतकरी उन्हाळ्यात नवा लाॅट घेत नाहीत. किंवा उत्पादन वाढविण्याचा विचार करत नाहीत. त्यामुळे उन्हाळ्यात चिकनच्या दरात सुधारणा झालेली दिसते.
बिझनेसलाईनने दिलेल्या वृत्तानुसार, सध्या चिकनला लिफिंग रेट १६८ रुपये प्रतिकिलो आहे. हा आतापर्यंतचा सर्वाधिक दर आहे. पण दुसरीकडे उत्पादनात १५ टक्क्यांपर्यंत घट झाली आहे.
कर्नाटकात सध्या शेतकऱ्यांना मिळणारा भाव १३० ते १४५ रुपये प्रतिकिलोवर आहेत. दोन महिन्यांपुर्वी शेतकऱ्यांना १०० रुपये भाव मिळत होता. तो आता मोठ्या प्रमाणात वाढला. उष्णता वाढल्याने शेतकऱ्यांनी प्लेसमेंट कमी केले होते. पण ऊनचा पारा कमी झाल्यानंतर प्लेसमेंटमध्ये वाढ होऊ शकते. त्यामुळे उत्पादनही वाढेल, असे शेतकऱ्यांनी सांगितले.
सध्या हैदराबाद येथील किरकोळ बाजारात चिकनचा दर ३१० ते ३२० रुपये प्रतिकिलो आहे. तर बंगळूरु बाजारात कोरकोळ दर २०० रुपये आहे. तर चेन्नई बाजारात चिवंत पक्षाचे भाव १३० रुपये प्रतिकिलो असून चिकनचे भाव ३६० रुपयांवर आहेत. केरळमध्ये जिवंत कोंबडीचे भाव १६७ रुपयांवर आहेत. केरळमध्ये मटणापेक्षा चिकनचे भाव वाढल्याचे सांगितले जाते.
तमिळनाडूत मोठी वाढ
तमिळनाडूमध्ये चिकनच्या भावात चांगलीच वाढ झालेली दिसते. त्यासाठी दोन घटक कारणीभूत आहेत. एक तर उन्हाळ्यात प्रोटीनला वाढलेली मागणी आणि केरळमध्ये मासेमारीवर ४५ दिवस घातलेली बंदी, या दोन कारणांनी तमिळनाडूत चिकनची मागणी वाढून दर तेजीत आले.
मात्र तरीही सध्या चिकन हा प्रोटीनचा सर्वात स्वस्त स्त्रोत आहे. नमक्कलमध्ये सध्या अंड्याचे बाव ५ रुपये १५ पैसे प्रतिनग आहेत. मागील दोन आठवड्यांपासून हाच भाव आहे. पण एकदा शाळा उघडल्या की अंड्याच्या भावात सुधारणा होऊ शकते. कारण तमिळनाडूत शाळांमध्ये मध्यान्य भोजन योजनेत अंड्याचा समावेश करण्यात आला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.