Smart Cotton Farming: गत हंगामात कापसाला मिळालेल्या समाधानकारक दरामुळे यंदाच्या खरिपात अमरावती विभागात कापूस लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर उत्पादकता वाढीच्या उद्देशाने अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांत अतीघन कापूस लागवडीला प्रोत्साहन दिले जाणार असून, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, कृषी विद्यापीठे आणि कृषी विज्ञान केंद्रांच्या समन्वयातून विशेष मोहीम राबविली जाणार असल्याची माहिती विभागीय कृषी सहसंचालक गणेश घोरपडे यांनी दिली..विभागीय आयुक्त (महसूल) नयना गुंडे यांच्या उपस्थितीत झालेल्या विभागीय खरीप आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला अकोला, वाशीम, बुलडाणा, यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी तसेच कृषी अधिकारी ऑनलाइन पद्धतीने सहभागी झाले होते. खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी महसूल आणि कृषी विभागाने समन्वयातून काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला..Cotton Farming: कापूस शेतीत ४० टक्के खर्च मजुरीवरच .अमरावती विभागात दरवर्षी सरासरी दहा लाख हेक्टरवर कापसाची लागवड होते. हंगाम अखेरीस कापसाच्या दरात झालेल्या वाढीमुळे यंदा मोठ्या प्रमाणात शेतकरी सोयाबीनऐवजी कापसाकडे वळतील, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. त्याच पार्श्वभूमीवर कमी क्षेत्रातून अधिक उत्पादन मिळविण्यासाठी अतीघन लागवड पद्धतीचा प्रसार करण्यात येणार आहे. सुधारित बियाणे, संतुलित खत व्यवस्थापन, कीडनियंत्रण आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उत्पादनवाढ साधण्याचा विभागाचा प्रयत्न राहणार आहे..Cotton Farming: मराठवाड्यातील शेतकरी पिकवतोय ‘सोनेरी’ कापूस.वाशीमचे ‘९ एम’ मॉड्युल चर्चेतआकांक्षित जिल्हा अशी ओळख असलेल्या वाशीम जिल्ह्याने कृषी क्षेत्रात नवे प्रयोग सुरू केले असून, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरीफ शाह यांनी बैठकीत ‘९ एम’ मॉड्युलची माहिती दिली. मॅनपावर, मोटिव्ह, मनी, मार्केटिंग, मॉनिटरिंग, मॅनेजमेंट, मशीनरी, मेथड आणि मटेरियल या नऊ घटकांवर आधारित हे मॉड्युल राबविण्यात येणार आहे.स्मार्ट पेरणी पद्धतीला प्रोत्साहन दिले जाईल..‘वत्सगुल्म’ला चांगला प्रतिसादगत हंगामात आयोजित ‘वत्सगुल्म स्मार्ट पेरणी स्पर्धे’त तब्बल ३२ हजार ३३५ शेतकरी सहभागी झाले होते. या माध्यमातून १ लाख ३६ हजार २८९ एकर क्षेत्रावर स्मार्ट पद्धतीने पेरणी करण्यात आली होती. यंदाही या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळेल, असा विश्वास कृषी विभागाने व्यक्त केला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.