Kharif Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Sowing : अहिल्यानगर जिल्ह्यात खरिपाचा सहा लाख हेक्टरवर पेरा

Kharif Season : अहिल्यानगर जिल्ह्यात मे महिन्यात झालेल्या पावसाने पेरणी लवकर सुरू झाली. मात्र मध्यंतरी पावसाच्या उसंतीने पेरणीत अडथळे आले.

Team Agrowon

Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यात मे महिन्यात झालेल्या पावसाने पेरणी लवकर सुरू झाली. मात्र मध्यंतरी पावसाच्या उसंतीने पेरणीत अडथळे आले. आतापर्यंत खरिपाची ६ लाख ३५५ हेक्टरवर (८३.८२ टक्के) पेरणी झाली आहे. यंदा सरासरीच्या मक्याचे क्षेत्र वाढण्याचा तर मूग, उडीद, तूर, कापूस, बाजरीचे क्षेत्र कमी होण्याची शक्यता दिसत आहे.

जिल्ह्यात खरिपाचे ७ लाख १६ हजार २०९ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. यंदा अहिल्यानगर जिल्ह्यात मे महिन्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. यंदा तब्बल मे मधील पावसाची २२० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जून महिन्यातही मृग जोरदार बरसला.

त्यामुळे पेरण्याला लवकर सुरुवात झाली. जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पेरण्या वेगात सुरू होत्या. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारली. पावसाअभावी कोरडवाहू भागात पीक करपू लागल्याची स्थिती होती. आता दोन दिवसांपासून जोरदार नसला तरी हलका, रिमझिम पाऊस पडत असल्याने पिकांना दिलासा मिळाला आहे.

कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत अहिल्यानगर जिल्ह्यात ६ लाख ३५५ हेक्टरवर (८३.८२ टक्के) पेरणी झाली आहे. पाऊस सुरुवातीला आला तर मुग, उडीद आणि तुरीचे क्षेत्र वाढते हे ठरलेले असते. यंदा मात्र हे क्षेत्रही फारसे वाढलेले दिसत नाही.

आतापर्यंत उडदाची ६२ हजार २२७ हेक्टरवर, मुगाची ४६ हजार ६१९ हेक्टरवर पेरणी झाली आहे. तुरीची पेरणी सरासरीच्या ९४.४५ टक्के झाली आहे. कापसाची लागवडही सरासरीच्या ७९.३१ टक्के झाली आहे.

पेरणी (हेक्टरमध्ये) कंसात सरासरी क्षेत्र

भात ः ६०५० (१८७४५)

बाजरी ः ५१ हजार ३२४ (८९,६२९)

मका ः ८६ हजार ६९८ (७७,९९९)

तूर ः ६१ हजार ००१ (६४ हजार ५८५)

मूग ः ४६ हजार ६१९ (५१ हजार ९८०)

उडीद ः ६२ हजार २२७ (६७, ५९५)

भुईमूग ः ३ हजार ६२८ (६ हजार ६००)

सोयाबीन ः १ लाख ५६ हजार २५६ (१ लाख ७८ हजार ५०६)

कापूस ः १ लाख २३ हजार १८८ (१ लाख ५५ हजार ३२९)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nandini River Conservation: नंदिनी नदीचा श्वास मोकळा करण्यासाठी राबले हात

Social Awareness: सुशिक्षित समाजातील अंधश्रद्धा अधिक धोकादायक : माजी खासदार कुमार केतकर

Ahilyanagar MLAs: अहिल्यानगर ठरला राज्यातील सर्वाधिक आमदारांचा जिल्हा

Agriculture Awareness Campaign: संतुलित खत वापरासाठी कृषी विज्ञान केंद्राची जनजागृती मोहीम

Farm Loan Waiver Controversy: अटी, शर्तींचे जाळे टाकून शेतकऱ्यांची फसवणूक; कर्जमाफीवर विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT