Sugar Factory FRP Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane FRP : ऊसदरासाठी उतारा साडेआठ धरावा

Sugarcane Season : केंद्राने सहा वर्षांत एफआरपी वाढवली; पण त्याच्याबरोबर बेस उतारा वाढविल्यामुळे सध्या १०.२५ उताऱ्यामुळे तीन हजारांच्या जवळपास दर मिळत आहे.

Team Agrowon

Satara News : केंद्राने सहा वर्षांत एफआरपी वाढवली; पण त्याच्याबरोबर बेस उतारा वाढविल्यामुळे सध्या १०.२५ उताऱ्यामुळे तीन हजारांच्या जवळपास दर मिळत आहे. ऊसदर ठरवताना मूळ उतारा १०.२५ ऐवजी पूर्वीप्रमाणे ८.५० धरावा. पूर्वीच्या बेसनुसार शेतकऱ्यांना प्रतिटन ३७०० रुपये ऊसदर मिळेल, अशी मागणी ऊस नियंत्रण मंडळाचे शेतकरी प्रतिनिधी सचिन नलवडे यांनी केली.

ऊसदर किमतीचे धोरण ठरवण्यासाठी केंद्रीय कृषी खर्च, किंमत आयोगाचे अध्यक्ष विजय शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली आणि साखर आयुक्त चंद्रकांत पुलकंदवार यांच्या उपस्थितीत राज्यातील प्रगतिशील शेतकरी व ऊस नियंत्रण मंडळाचे सदस्य यांच्यासोबत बैठक झाली. त्यामध्ये श्री. नलवडे यांनी ही मागणी केली.

ते म्हणाले, ‘‘वाढलेला तोडणी वाहतूक खर्च शेतकऱ्यांच्या एफआरपीतून वजा होत आहे. त्यामुळे मूळ एफआरपी वाढली नसल्याचे दिसत आहे. उसाच्या पदार्थातील नफ्याचा वाटा हा सी. रंगराजन समितीनुसार मळी, बगॅस, मोलॅसिस एवढ्याच प्राथमिक उपपदार्थापुरता मर्यादित आहे.

उपपदार्थातील नफा शेतकऱ्यांना वाटण्याचे सूत्र बदलून त्यामध्ये इथेनॉल, कोजनरेशन, अल्कोहोल, स्पिरीट व अन्य उपपदार्थांचा समावेश करावा. त्यामुळे शेतकऱ्यांना ३०० ते ४०० रुपये जास्तीचे मिळतील.’’

चार हजार दर मिळावा

कोपर्डे हवेलीचे शेतकरी सुदाम चव्हाण यांनी शेतीचा एकरी खर्च सव्वा लाखाच्या पुढे गेला असून, अठरा महिन्यांनी शेतकऱ्यांना उसातून मिळणारा नफा हा फक्त २५ हजार रुपये म्हणजे महिन्याला १५०० रुपये मिळतो. तो शेतमुजरापेक्षा कमी आहे. त्यामुळे उसाला चार हजार दर मिळावा, अशी मागणी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT