Rain Update  Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Update : नगर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या ८२ टक्के पाऊस

Team Agrowon

Nagar News : जिल्ह्यात यंदा आतापर्यंतच्या सरासरीच्या तुलनेत यंदा शनिवारपर्यंत ८२ टक्के पाऊस झाला आहे. साधारणपणे ७५ मिलिमीटर पाऊस झाल्यावरच कापूस लागवडी, पेरण्या कराव्यात असे कृषी विभागाने आवाहन केले आहे. प्रशासनाकडे झालेल्या नोंदीनुसार आतापर्यंत ६५ मंडलांत ७५ मिमीपेक्षा अधिक पाऊस झालेला आहे.

६० मंडलांत आतापर्यंतची पावसाने सरासरी ओलांडली आहे. वीस मंडलांत २०० मिलीमिटरपेक्षा अधिक पाऊस झाला असून अजूनही वीस मिलीमीटरच्या आत २० महसूल मंडळात ७५ मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस आहे. दोन मंडलांत ३०० मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस पडला आहे.

आतापर्यंत ६० मंडलांत ७५ मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. ५८ महसूल मंडलात पावसाची सरासरी ओलांडली आहे. नगर जिल्ह्यातील नगर, शेवगाव, पाथर्डी, नेवासा, राहुरी, श्रीगोंदा, जामखेड, कर्जत, पारनेर भागात कापसाची लागवड केली जाते. सध्या शेवगाव, पाथर्डी, नेवासा भागात कापसाच्या लागवडीला सुरवात झाली आहे.

मंडळनिहाय पाऊस

नालेगाव ः १५२, सावेडी ः १२६, कापूरवाडी ः १३९, केडगाव ः १२४, भिंगार ः २०४, नागापूर ः १४१, जेऊर ः २४४, चिचोंडी ः १८९, वाळकी ः १४९, चास ः १४६ रुईछत्तीशी ः २१०, पारनेर ः १९३, भाळवणी ः ९५, सुपा ः २२३, वाडेगव्हाण ः २०१, वडझिरे ः ६३, निघोज ः ७८, टाकळी ः १४६, पळशी ः९८, श्रीगोंदा ः २४१, काष्टी ः २१९, मांडवगण ः १६५, बेलवंडी ः २२६, चिंभळा ः २१०, पेंडगाव ः २५६, देवदैठण ः १५७, कोळगाव ः २७३, कर्जत ः २१२, राशीन ः ४०१, भांबोरा ः३१८, कोंभळी ः १६७, मिरजगाव ः १४८, माही ः १७१, जामखेड ः १६३, आरणगाव ः १३३, खर्डा ः १८१, नान्नज ः २७३, नायगाव ः १६९,

शेवगाव ः १७५, भातकुडगाव ः ९४, बोधेगाव ः ६८, चापडगाव ः १०४, ढोरजळगाव ः १९९, एरंडगाव ः ४८, पाथर्डी ः १५३, माणिकदौडी ः १७८, टाकळी ः १९०, कोरडगाव ः १५७, करंजी ः २९१, मिरी ः, २०४, नेवासा खुर्द ः १४४, नेवासा बुद्रुक ः ९६, सलाबतपूर ः १६६, कुकाणा ः २२४,, चांदा ः ५३,, घोडगाव ः ९२, सोनई ः ११४, वडाळा ः १४४, राहुरी ः ६८, सात्रळ ः ७९, तहाराबाद ः ७० देवळाली ः १०६, टाकळीमिया ः १२९, ब्राह्मणी ः १३५,

वांबोरी ः ११८, संगमनेर ः ५१, धांदरफळ ः ५९, आश्वी ः १२७, शिबलापूर ः ४२, तळेगाव ः ९३, समनापुर ः ७७, घारगाव ः ११४, डोळासणे ः ११४, साकूर ः ५७, पिंपरणे ः १२७, अकोले ः ७६, विरगाव ः ६४, समशेरपूर ः १३५, साकुरवाडी ः ४५, राजुर ः ५९, शेंडी ः ५९, कोतुळ ः ६१, ब्राह्मणवाडा ः ३९, कोपरगाव ः ५६, रवंदे ः ७३, सुरेगाव ः ७२, दहिगाव ः १२३, पोहेगाव ः १४३, श्रीरामपुर ः १०९, बेलापूर ः ११८, उंदीरगाव ः १००, टाकळीभान ः ८५, राहाता ः ५२, शिर्डी ः ६२, लोणी ः ११६, बाभळेश्वर ः ९०, पुणतांबा ः १३३.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : कांद्यात चढ उतार कायम; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत टोमॅटो दर?

Khapali Wheat : खपली गहू लागवडीला हवे प्रोत्साहन

Nana Patole : शेतकऱ्यांचा आवाज सत्तेपर्यंत पोहोचवणारे नाना पटोले

Farmers Welfare : शेतकरी कल्याणाचा वसा

Return Monsoon : परतीचा माॅन्सून महाराष्ट्रात दाखल; राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT