Crop Damage  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage Compensation : नांदेडला नुकसानग्रस्तांसाठी ८१२ कोटींची मागणी

Heavy Rain Crop Loss : नांदेडमध्ये एक ते तीन सप्टेंबरला झालेल्या अतिवृष्टीमुळे जिरायती, बागायती व फळपिकांचे पाच लाख ९६ हजार ५१७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते.

कृष्णा जोमेगावकर

Nanded News : नांदेडमध्ये एक ते तीन सप्टेंबरला झालेल्या अतिवृष्टीमुळे जिरायती, बागायती व फळपिकांचे पाच लाख ९६ हजार ५१७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. हा फटका जिल्ह्यातील सात लाख ८३ हजार ९१५ शेतकऱ्यांना बसल्याचा अंतिम अहवाल जिल्हा प्रशासनाने विभागीय आयुक्तांना कळविला.

यात नुकसानग्रस्तांच्या भरपाईसाठी ८१२ कोटी ३८ लाख साठ हजार रुपयांच्या सानुग्रह अनुदानची मागणी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे केली आहे. या वेळी एसडीआरएफ निकषाबाहेर अनुदानाच्या रकमेसह क्षेत्राच्या मर्यादेतही वाढ केली आहे.

नांदेड जिल्ह्यात एक ते तीन सप्टेंबर या कालावधीत ६२ मंडलांत अतिवृष्टी झाली. यात खरिपातील जिरायती, बागायती व बहुवार्षिक पिकासह शेतजमिनीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला होता.

यानंतर जिल्हा प्रशासनाकडून ग्रामस्थरीय समितीमार्फत नुकसानीचे संयुक्त पंचनामे करण्यात आदेश दिले होते. यानुसार जिल्ह्यात पाच लाख ९६ हजार ५१७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. हा फटका जिल्ह्यातील सात लाख ८३ हजार ९१५ शेतकऱ्यांना बसला. यात नुकसानग्रस्तांच्या भरपाईसाठी ८१२ कोटी ३८ लाख साठ हजार रुपयांच्या सानुग्रह अनुदानाची मागणी जिल्हा प्रशासनाने छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तांकडे केली आहे.

या वेळी राज्य शासनाकडून प्राप्त मान्यतेनुसार पीक नुकसान अनुदान वाटपाचे दर वाढविले आहेत. यात जिरायतीसाठी साठेआठ हजारांवरून तेरा हजार पाचशे रुपये, बागायतीसाठी १७ हजारांवरून २७ हजार तर बहुवार्षिक पिकांसाठी २२ हजार पाचशे रुपयांवरून ३६ हजार रुपये प्रतिहेक्टर करण्यात आले आहेत.

तसेच अनुदान वाटपातील क्षेत्राची मर्यादा ही दोन हेक्टरवरून तीन हेक्टर वाढविली आहे. जिल्ह्यात अतिवृष्टी दरम्यान पुरामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. यात बिलोली तालुक्यातील एक हजार ८८७ शेतकऱ्यांच्या १५८५ हेक्टर क्षेत्राचे नुकसान असून शेतकऱ्यांना दोन कोटींवर अनुदान मिळणार आहे.

तालुकानिहाय बाधित शेतकरी संख्या, नुकसान क्षेत्र (हेक्टरमध्ये)

तालुका बाधित शेतकरी नुकसान क्षेत्र अपेक्षित निधी

नांदेड ३४,६४१ २१,७५२ २९.८५ कोटी

अर्धापूर ३२,४४८ २४,२४५ ३२.९७ कोटी

कंधार ७३,६५० ५२,४०२ ७१.२७ कोटी

लोहा ८०,८४० ६१,६४२ ८४.४० कोटी

बिलोली ३६,०९९ ३४,१६९ ५६.६४ कोटी

देगलूर ६१,१२३ ३७,४६२ ५०.९५ कोटी

मुखेड ७९,६०३ ४१,११४ ५५.९२ कोटी

धर्माबाद २८,७९५ २०,०४७ २७.२६ कोटी

उमरी ३४,०३८ २४,०४२ ३२.७० कोटी

भोकर ४३,०५९ ३८,३०८ ५२.१९ कोटी

मुदखेड ३०,८१२ २१,५८४ २९.३५ कोटी

हदगाव ७४,२२८ ६०,४९२ ८२.२७ कोटी

हि.नगर ३४,५३३ ३२,८०५ ४४.६१ कोटी

किनवट ५७,७०२ ५९,१३२ ८०.४२ कोटी

माहूर २६,१७२ २५,६८१ ३५.१२ कोटी

एकूण ७,८३,९१५ ५,९६,५१७ ८१२.३८ कोटी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT