Water Storage Agrowon
ॲग्रो विशेष

Dhule Water Storage : धुळ्यातील प्रकल्पांमध्ये ८१ टक्के पाणीसाठा

Water Stock : गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील प्रकल्पात ७५ टक्के साठाही झाला नव्हता. यंदा वरुणराजाने दमदार हजेरी लावल्याने जिल्हा पाणीटंचाईमुक्त राहील अशी स्थिती आहे.

Team Agrowon

Dhule News : जिल्ह्यात सर्व जल प्रकल्पांमध्ये आठ वर्षांनंतर सर्वाधिक म्हणजे ८१.३१ टक्के जलसंचय झाला आहे. मध्यम प्रकल्पात ८०.८६ टक्के, तर लघुप्रकल्पात ८२.६४ टक्के जलसाठा झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील प्रकल्पात ७५ टक्के साठाही झाला नव्हता. यंदा वरुणराजाने दमदार हजेरी लावल्याने जिल्हा पाणीटंचाईमुक्त राहील अशी स्थिती आहे.

धुळे जिल्ह्यात आतापर्यंत २ हजार ५१२ मिलिमीटर पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी १ हजार ८२७ मिमी पाऊस झाला होता. जिल्ह्यात ४४ लघुप्रकल्प व १३ मध्यम प्रकल्प असून लघुप्रकल्पात ९३. ९१२ दशलक्ष घनमीटर तर मध्यम प्रकल्पात २७५.२० दशलक्ष घनमीटर पाणी आहे. लघु व मध्यम प्रकल्पात एकूण ३९८.९८८ दलघमी पाणी आहे. गेल्या वर्षी २०४.४२ दलघमी जलसंचय होता.

सात प्रकल्प ओव्हरफ्लो

जिल्ह्यातील सात मध्यम प्रकल्प १०० टक्के भरली असून एकात ९५ टक्केपेक्षा अधिक जलसाठा झाला आहे. चार प्रकल्पात ७५ टक्के पेक्षा जास्त तर एका प्रकल्पात ३५ टक्के जलसाठा आहे.

गेल्या वर्षी याच दिवशी लघुप्रकल्पात २१.०५ टक्के व मध्यम प्रकल्पात ६२.३५ टक्के असा ५१.७२ टक्के पाणीसाठा होता. त्या तुलनेत यंदाची स्थिती खूपच समाधानकारक आहे.

मध्यम प्रकल्पांपैकी सध्या पांझरा प्रकल्पात ३५.६३ दलघमी पाणी असून, मालनगांव प्रकल्पात ११.३२ दलघमी, जामखेडीत १२.३४, कनोली ८.४५, बुराई १४.२० दलघमी तसेच अन्य प्रकल्पांत मिळून एकूण २७५.२० दलघमी पाणीसाठा आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Season 2024 : दामाजी, विठ्ठलराव शिंदे कारखान्यांचा वाहतूक खर्च कमी

Latur Voting Percentage : वाढलेल्या मताच्या टक्क्याचा कोणाला बसणार?

Nashik Assembly Voting : नाशिक जिल्ह्यात सरासरी ६७.९७ टक्के मतदान

Agriculture Irrigation : सिंचन योजनेतून शेतीसाठी २१ टीएमसी पाणी

GM Mustard : जीएमला परवानगी दिली तर तेलबिया उत्पादन वाढेल; जीएमला परवानगी देण्याची उद्योगांची मागणी

SCROLL FOR NEXT