Water Storage : दमदार पावसामुळे जलस्रोतांतील साठ्यात वाढ

Heavy Rain : विशेष म्हणजे पावसाळ्यातील गेल्या तीन महिन्यांत देवणी तालुक्यातील अपवाद वगळता सर्वच जलसाठे कोरडेच पाहावयास मिळत होते.
Water Storage
Water StorageAgrowon
Published on
Updated on

Devani News : परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे जलस्रोतांतील जलसाठ्यात चांगलीच वाढ झाली आहे‌. विशेष म्हणजे पावसाळ्यातील गेल्या तीन महिन्यांत देवणी तालुक्यातील अपवाद वगळता सर्वच जलसाठे कोरडेच पाहावयास मिळत होते. मात्र, मुसळधार पावसामुळे हे चित्र बदलले. पिण्याच्या पाण्यासह शेतीला आधार झाला आहे.

देवणी तालुक्यातील आनंदवाडी बोळेगाव येथील साठवण तलाव शंभर टक्के भरला आहे. नुकत्याच झालेल्या पावसामुळे तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. तर, टाकळी व बोंबळी तलाव पण शंभर टक्के क्षमतेने भरले आहेत. काही गावांतील तलाव पूर्ण क्षमतेने अद्यापही भरले नाहीत, मात्र हजेरी लावणाऱ्या पावसामुळे आगामी काळात तलाव पूर्ण क्षमतेने भरतील, अशी अपेक्षा ग्रामस्थांना आहे.

Water Storage
Water Storage : दोन दिवसांच्या पावसाने २० प्रकल्प तुडुंब

सप्टेंबर महिन्याच्या सुरवातीपासूनच पावसाने सर्वत्र दमदार हजेरी लावली. त्यामुळे काही गावांतील नदी, नाले, तलाव, बांधारे पूर्ण भरून वाहत आहेत. विहिरींच्या व कूपनलिकांच्या पाणीपातळीत चांगली वाढ झाली आहे. शेतशिवारात हिरवा चारा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही सुटला आहे.

Water Storage
Water Storage : सांगली जिल्ह्यातील पस्तीस प्रकल्पात पाणीसाठा ‘फुल्ल’

ता. एक सप्टेंबरच्या दुपारपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील मांजरा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. धनेगाव उच्च पातळी बंधाऱ्याचे तीन दरवाजे ३ मीटरने उचलण्यात आलेले आहेत. सध्या बंधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धनेगावच्या बंधाऱ्यात ७४ टक्के इतका जलसाठा उपलब्ध आहे, अशी माहिती सहायक उपअभियंता डी.जे. कोल्हे यांनी दिली.

देवणी तालुक्यात पावसाची चांगली हजेरी लागली. यात आतापर्यंत देवणी महसूल मंडळात ५३३ मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे, तर बोरोळ महसूल मंडळात ४४९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस वलांडी महसूल मंडळात ६९३ मिलिमीटर पडलेला आहे. या पावसामुळे काही ठिकाणी पिकांचे नुकसान झाले आहे. अनेक शेतातील पिके पिवळी पडली आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com