Marine Species  Agrowon
ॲग्रो विशेष

Marine Species : सिंधुदुर्ग किनारपट्टीवर आढळल्या ८० दुर्मीळ समुद्रीय प्रजाती

Sindhudurg Costal Area : ज्युनिअर सायंटिस्ट देवगड आणि भारतीय प्राणी वैज्ञानिक संस्था पुणे यांनी सिंधुदुर्ग किनारपट्टीच्या केलेल्या सर्व्हेक्षणात ८० हून अधिक दुर्मिळ समुद्रीय प्रजातीची नोंद आढळून आली आहे.

Team Agrowon

Sindhudurg News : ज्युनिअर सायंटिस्ट देवगड आणि भारतीय प्राणी वैज्ञानिक संस्था पुणे यांनी सिंधुदुर्ग किनारपट्टीच्या केलेल्या सर्व्हेक्षणात ८० हून अधिक दुर्मिळ समुद्रीय प्रजातीची नोंद आढळून आली आहे.

यातील सर्वाधिक ४० प्रजाती कुणकेश्वरमध्ये तर मिठमुंबरीत आणि मालवणमध्ये प्रत्येकी १३ प्रजाती आढळून आल्या आहेत. दोन्ही संस्थांच्या प्राणीशास्त्र विभागाचे विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी ऑक्टोबर २०२३ पासून सिंधुदुर्ग किनारपट्टीवर सर्व्हेक्षण सुरू केले होते.

पुणे येथील राहुल सारंग यांच्या नेतृत्वाखालील विद्यार्थ्यांनी हे सर्व्हेक्षण केले. या सर्व्हेक्षणात सिंधुदुर्ग किनारपट्टीवर ८० हून अधिक दुर्मीळ समुद्रीय प्रजाती आढळून आल्या.

यामध्ये अतिदुर्मीळ मानले जात असलेला सोल्जर खेकडा, लाम्प्रोमेट्रा, पोर्सिलेन खेकडे आढळून आले आहेत. कुणकेश्वरची किनारपट्टी समुद्रीय प्रजातींनी अधिक समृद्ध असल्याचे सर्व्हेक्षणात दिसून आले आहे.

या किनारपट्टीवर तब्बल ४० समुद्रीय प्रजाती आढळून आल्या. मिठमुंबरी, मालवणमध्ये १३, तर वेंगुर्ल्यात ३ प्रजाती दिसून आल्या आहेत. या प्रजातींची माहिती सर्वसामान्यांना व्हावी आणि या प्रजातींचे संवर्धन व्हावे याकरिता लवकरच वसुंधरा विज्ञान केंद्रात प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Procurement : हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी ४७८ केंद्रे

Livestock Census : राज्यात ॲपद्वारे होणाऱ्या पशुगणनेस आजपासून प्रारंभ

Dana Cyclone : ‘डाना’ चक्रीवादळ आज किनाऱ्याला धडकण्याची शक्यता

Fruit Crop Insurance Issue : फळपीक विमा योजनेत बोगस अर्जांचे ‘पीक’

Vidarbha Weather : विदर्भात पावसाला पोषक हवामान

SCROLL FOR NEXT