Turtle Conservation : कासव संवर्धनात गुहागर राज्यात अव्वल

Olive Ridley Turtle : यंदा हंगामात गुहागर बाग व गुहागर बरचापाट येथील समुद्रकिनारी १६ डिसेंबर २०२३ रोजी पहिले घरटे आढळले.
Turtle Conservation
Turtle ConservationAgrowon

Ratnagiri News : मागील वर्षीच्या तुलनेत गुहागर तालुक्यातील समुद्र किनाऱ्यावर तीन ठिकाणी ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवांनी तयार केलेल्या घरट्यांची संख्या, दिलेली अंडी व जन्माला आलेली पिले या आकडेवारीवरून यंदा गुहागरला कासवांनी सर्वाधिक पसंती दिली आहे. महाराष्ट्रामध्ये गुहागरने कासव संवर्धनात अव्वल स्थान पटकावले आहे, असे विभागीय वन अधिकारी दीपक खाडे यांनी सांगितले.

ऑलिव्ह रिडले कासवाच्या माद्या दर वर्षी नोव्हेंबरपासून महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवर अंडी घालण्यासाठी दाखल होतात. यंदा हंगामात गुहागर बाग व गुहागर बरचापाट येथील समुद्रकिनारी १६ डिसेंबर २०२३ रोजी पहिले घरटे आढळले. पुढे आजपर्यंत २२३ घरटी व त्यामध्ये २३ हजार १९८ अंडी सापडली. ही अंडी मिळालेल्या तारखेनुसार हॅचरीमध्ये सुरक्षित केली आहेत.

संवर्धनानंतर ही पिले घरट्यांमधून बाहेर येण्यास सुरुवात झाली आहे. १ मार्च रोजी ३२१ कासवांची पिले बाहेर पडली. ऑलिव्ह रिडले कासवांच्या विणीचा हंगाम मार्चमध्ये सुरू होतो. मार्चच्या पहिल्या तारखेला मोठ्या प्रमाणात पिले बाहेर पडण्यास सुरुवात झाल्यामुळे कासवमित्र, वनकर्मचारी व वन्यप्राणिमित्र समाधानी आहेत.

Turtle Conservation
Agricultural Produce Market Committee : कृषी उत्पन्न बाजार समितींना राष्ट्रीय दर्जा? राज्यातील एका बाजार समितीचा समावेश होण्याची शक्यता

आजपर्यंत १३१८ अंड्यांतून कासवाची पिल्ले बाहेर आली. विभागीय वन अधिकारी दीपक खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक वनसंरक्षक वैभव बोराटे, परिक्षेत्र वन अधिकारी राजश्री कीर यांच्या नियंत्रणाखाली कासवांची अंडी संरक्षित करण्यासाठी वनपाल संतोष परिशेट्टे, वनरक्षक अरविंद मांडवकर व कासव मित्र यांनी केलेल्या मदतीमुळे महाराष्ट्रात कासव संरक्षण व संवर्धनात अव्वल स्थान मिळवले आहे.

Turtle Conservation
Agriculture commissionerate : जैव उत्तेजके दाव्यात ‘कृषी’ला शेवटची संधी

जिल्ह्यातील विविध किनारे कासवांनी मोठ्या प्रमाणावर अंडी घालण्यासाठी निवडणे, हे तेथील स्थानिकांच्या मेहनतीचे फळ आहे. कासव संवर्धनाला आधुनिक पद्धतीची जोड देण्यात आली असून कासवाच्या घरट्यांच्या नोंदी, घरट्यातून बाहेर पडणाऱ्या पिलांची संख्या आदी नोंदी एम. टर्टल अॅपमध्ये घेण्यात येत आहेत. कासवांच्या अंड्यांचे तंत्रशुद्धपणे व प्रभावीपणे संरक्षण व संवर्धन होण्यासाठी हंगामाच्या सुरुवातीला कांदळवन कक्ष व वन विभागामार्फत कार्यशाळा घेतली जाते.

अशी सोडली पिल्ले....

हॅचरी घरटी अंडी सोडलेली पिले

गुहागर बाग ६० ६१३१ ९५६

गुहागर वरचा पाठ १३९ १४४२७ २३१

तवसाळ २४ २६४० १३१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com