Paddy Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Plantation : मुरूडमध्ये भातलावणी अंतिम टप्प्यात

Paddy Farming : मुरूड तालुक्यात यंदा समाधानकारक पाऊस पडल्यामुळे भातलावणी अंतिम टप्प्यात आली आहे. दमदार पावसामुळे खारपट्ट्यात तसेच सखल भागातील शेती लावण्यात शेतकरी व्यग्र दिसून येत आहे.

Team Agrowon

Palghar News : मुरूड तालुक्यात यंदा समाधानकारक पाऊस पडल्यामुळे भातलावणी अंतिम टप्प्यात आली आहे. दमदार पावसामुळे खारपट्ट्यात तसेच सखल भागातील शेती लावण्यात शेतकरी व्यग्र दिसून येत आहे. तालुक्यात ८० टक्के भातलावणीचे काम पूर्ण झाले असून आठवडाभरात उर्वरित लागवड पूर्ण होईल, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.

यंदा मेमध्येच अवकाळीने जोरदार हजेरी लावली. ८२९ मि.मी. इतक्या मोठ्या प्रमाणावर पावसाची नोंद झाली आहे. त्‍यामुळे भात पेरणीचे तंत्रच विस्कटून गेल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली होती. जमिनीतील वापसा अचानक पडलेल्या पावसामुळे निघून गेल्याने राब कसे तयार होतील, या चिंतेने बळीराजा त्रस्त झाला होता.

मात्र निसर्गाच्या कृपेमुळे कधी ऊन तर कधी पाऊस कोसळल्याने राब फुकट गेले नसल्याने शेतकऱ्यांना लाभ झाला, अन्यथा रऊ पद्धतीचा वापर करण्याखेरीज पर्याय नसल्याचे शेतकऱ्यांतून सांगण्यात आले.

३,२०० हेक्टर क्षेत्रावर लागवड

मुरूड तालुक्यात भातलागवड क्षेत्र ३,२०० हेक्टर आहे. यामध्ये अत्यल्प भूधारकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. भाताच्या विविध वाणांमध्ये सुवर्णा, जया, वाडा कोलम, रूपाली, चिंटू, श्री, शुभांगी, सारथी, कोमल, जोरदार आदी प्रकार उपलब्ध आहेत.

पारंपरिक पद्धतीने अर्थात बैलजोड घेऊन चिखलणी, नांगरणी करून भातलागवड केली जात आहे. कुठे आधुनिक यंत्राचा वापर करण्यात येत आहे तर काही ठिकाणी सगुणा पद्धतीचा वापर करण्यात येत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

E-Peek Pahani : ‘ई-पीकपाहणी’चा खोळंबा

Crop Damage Survey : बाधित पिकांचे तातडीने पंचनामे करा

Latur Rain : दुसऱ्या दिवशीही लातुरात पावसाच्या जोरदार सरी

Crop Insurance : विमा परताव्याची रत्नागिरीतील ३६ हजार बागायतदारांना प्रतीक्षा

Sugarcane Cultivation : सांगली जिल्ह्यात ऊस लागवडीस गती

SCROLL FOR NEXT