Tanker Water Supply Agrowon
ॲग्रो विशेष

Water Supply Provision : टँकरने पाणीपुरवठ्यासाठी ८० कोटींची तरतूद

Plan of Water Scarcity : नगर जिल्हा प्रशासनाने उन्हाळ्यातील टंचाई निवारणासाठी ८४ कोटी ४५ लाख रुपयांच्या आराखडा तयार केला आहे. टँकरने पाणीपुरवठ्यासाठी ८० कोटींची तरतूद केली आहे.

Team Agrowon

Nagar News : नगर जिल्हा प्रशासनाने उन्हाळ्यातील टंचाई निवारणासाठी ८४ कोटी ४५ लाख रुपयांच्या आराखडा तयार केला आहे. टँकरने पाणीपुरवठ्यासाठी ८० कोटींची तरतूद केली आहे. याशिवाय नळपाणी योजनांची तात्पुरती दुरुस्ती, खासगी विहिरी अधिग्रहित करणे, नवीन विहिरी, सरकारी विहिरीतून गाळ काढणे अशा उपाययोजनांसाठी ४ कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

जिल्ह्यात यंदाही पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात सरासरी ऑक्टोबर महिन्यापर्यंत पाऊस पडत असतो. जिल्ह्यात पडलेल्या पावसाच्या आधारे टंचाई कृती आराखड्याच्या कामाला सुरुवात होते.

या वर्षीच्या आराखड्यात १ हजार १८५ गावांत आणि ३ हजार ८८६ वाड्यावस्त्यांवर पुढील जून २०२४ पर्यंत संभाव्य पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरण्यात आली आहे. या ठिकाणी १ हजार ४४५ उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. पाण्याच्या टँकरसाठी सर्वाधिक ८० कोटी ९४ लाख रुपयांची तरतूद आहे.

दृष्टिक्षेपात आराखडा

विहिरीचे खोलीकरण करणे ४ लाख २४ हजार

खासगी विहीर अधिग्रहित करणे १ कोटी ६९ लाख

बैलगाडीद्वारे पाणीपुरवठा करणे ८० कोटी ९५ लाख

प्रगतिपथावरील नळ योजना तातडीने पूर्ण करणे,

नळ योजनांची विशेष दुरुस्ती करणे २ लाख

नवीन विंधन विहिरी घेणे ५ लाख ३१ हजार

नोव्हेंबर महिन्यात जिल्ह्यात गारपीट आणि जोरदार पाऊस झाला. या अवकाळी गारपीट आणि पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांचे काही तालुक्यांत नुकसान झाले. परंतु भूजल पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे संभाव्य पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता कमी झाली आहे.
जे. एस. घोरपडे, नायब तहसीलदार, आपत्ती निवारण शाखा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Productivity : जमीन आरोग्य जपल्यास भारतातही ब्राझीलइतकी कापूस उत्पादकता

Ragi Cultivation : नाचणी पिकांकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ

Shaktipeeth Highway Protest : ‘शक्तिपीठ’ नको, आमची शेतीच हवी

Solar Project : पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागात दहा सौर प्रकल्प

Dattatray Bharane : क्रीडा खात्याचे बरे होते, लय त्रास नव्हता; आता त्रास घ्यावाच लागेल

SCROLL FOR NEXT