Rabi Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Sowing : रब्बीची परभणीत ७८.२९ टक्के, तर हिंगोलीत ११३.४६ टक्के पेरणी

Team Agrowon

Parbhani News : परभणी-हिंगोली जिल्ह्यांत मॉन्सूनोत्तर पावसामुळे निर्माण झालेल्या ओलाव्यामुळे रब्बी पिकांच्या पेरा वाढ झाली आहे. शुक्रवार (ता. १५)पर्यंत परभणी जिल्ह्यात २ लाख १२ हजार १३ हेक्टर (७८.२९ टक्के) व हिंगोली जिल्ह्यात २ लाख ७०४ हेक्टर (११३.४६ टक्के) अशी दोन जिल्ह्यांत मिळून एकूण ४ लाख १२ हजार ७१७ हेक्टरवर पेरणी झाली असून, रब्बी ज्वारी, हरभरा, करडईच्या पेऱ्यात वाढ झाली आहे.

परभणी जिल्ह्यात शुक्रवार (ता. १५)पर्यंत रब्बीच्या सरासरी २ लाख ७० हजार ७९४ हेक्टर पैकी २ लाख १२ हजार १३ हेक्टरवर (७८.२९ टक्के) पेरणी झाली आहे. त्यात रब्बी ज्वारीची १ लाख १३ हजार ८९ पैकी ८३ हजार ४४० हेक्टरवर (७३.७८ टक्के), गव्हाची ३९ हजार ३०८ पैकी १३ हजार ८७६ हेक्टर (३५.३० टक्के), मक्याची २ हजार ६ पैकी ६४७ हेक्टर (३१.०५ टक्के) पेरणी झाली आहे.

हरभऱ्याची १ लाख १२ हजार १७० पैकी १ लाख १२ हजार ६२३ हेक्टर (१००.४ टक्के) व करडईची ३ हजार ३७१ पैकी १ हजार ३०४ हेक्टर (३८.७० टक्के), जवसाची ११९ पैकी ११ हेक्टर (९.२४ टक्के), तिळाची ३३.६४ पैकी २५ हेक्टर (७४.३२ टक्के), सूर्यफुलाची २६.२ पैकी २ हेक्टर (७.६८ टक्के) पेरणी झाली आहे. हिंगोली जिल्ह्यात शुक्रवार (ता. १५)पर्यंत रब्बीच्या सरासरी १ लाख ७६ हजार ८९१ हेक्टरपैकी २ लाख ७०४ हेक्टर (११३.४६ टक्के) पेरणी झाली आहे.

त्यात ज्वारीची ११ हजार ६९७ पैकी १५ हजार २४९ हेक्टर (१३०.३७ टक्के), गव्हाची ४२ हजार ५०५ पैकी ३१ हजार ५१७ हेक्टर (७४.१५ टक्के), मक्याची ९७१ पैकी ६०९ हेक्टर (६२.७२ टक्के) पेरणी झाली. हरभऱ्याची १ लाख २० हजार १४७ पैकी १ लाख ५१ हजार ३३५ हेक्टर (१२५.९६ टक्के) पेरणी झाली. करडईची २०५ पैकी १ हजार ४९८ हेक्टर (७२८.३९ टक्के), तिळाची १८.६६ पैकी ४९ हेक्टर (२६२ टक्के) पेरणी झाली आहे.

या दोन जिल्ह्यांत मॉन्सूनोत्तर पावसानंतरच्या ओलाव्यावर पेरणी केली. त्यामुळे ज्वारी, हरभरा, करडई या पिकांच्या पेऱ्यात वाढ झाली आहे. मर रोगाच्या मोठ्या प्रमाणातील प्रादुर्भावामुळे अनेक शेतकऱ्यांनी सुरुवातीला पेरणी केलेला हरभरा मोडून दुबार पेरणी केली.

परभणी जिल्ह्यात हरभऱ्याची सरासरी एवढी पेरणी झाली आहे. अन्य पिकांचा पेरा सरासरीपेक्षा कमी आहे. मानवत तालुक्यात सरासरीपेक्षा जास्त, तर अन्य आठ तालुक्यांत सरासरीच्या तुलनेत कमी पेरा आहे. हिंगोली जिल्ह्यातील सर्व पाच तालुक्यांत सरासरीपेक्षा अधिक पेरणी झाली आहे. हरभरा, ज्वारी, करडई यांच्या पेऱ्याने सरासरी क्षेत्राचा टप्पा पार केला आहे.

तालुकानिहाय पेरणी स्थिती (हेक्टरमध्ये) (शुक्रवार, ता. १५पर्यंत)

तालुका सरासरी क्षेत्र पेरणी क्षेत्र टक्केवारी

परभणी ५७९०० ४३७५४ ७५.५७

जिंतूर ५३७३० ३४२५८ ६३.७६

सेलू ३३५६१ २३६९० ७०.५९

मानवत १६११९ १८०२० १११.७९

पाथरी १७०७२ १५०९६ ८८.४२

सोनपेठ १५६९८ १४३२९ ९१.२८

गंगाखेड ३२०८६ २५३८५ ७९.१२

पालम २०१३० १४९९० ७४.४६

पूर्णा २४४९५ २२४९१ ९१.८२

हिंगोली ३१०७४ ३५३२८ ११३.४०

कळमनुरी ५०१४६ ५३०७७ १०५.८४

वसमत ४२०१९ ४६३०४ ११०.२०

औंढा नागनाथ २५७२६ ३७६८० १४६.४६

सेनगाव २७९२४ २८४०२ १०१.७१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Policy : जगात भारतीय शेतकरी सरकारी धोरणांचे बळी; देशात सरकारी धोरणांचा शेतकऱ्यांना नकारात्मक आधार

Cotton Crop Damage : अहिल्यानगर जिल्ह्यात पावसामुळे कापसाचे नुकसान

Vidhansabha Election Amravati : अमरावती जिल्ह्यात वाढले एक लाखांवर मतदार

Women And Child Development State Level Award : परभणी जिल्ह्याला महिला, बाल विकासचा राज्यस्तरीय पुरस्कार

Kolhapur Market Committee : तोलाईदारांच्या वेतनाचा पेच कायम, बाजार समिती अन् अडत्यांनी दाखवले एकमेकांकडे बोट

SCROLL FOR NEXT