Water Supply Agrowon
ॲग्रो विशेष

Water Supply Scheme : पाणीपुरवठ्याच्या योजनांकडे थकले ७८ कोटींचे वीजबिल

वीज बिलांची वसुली होत नसल्याने आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या महावितरणपुढे थकित रक्कम वसुलीचे मोठे आव्हान उभा राहिले आहे.

Team Agrowon

Solapur News : उन्हाळ्याची चाहूल आता लागली आहे. दिवसेंदिवस उन्हाचा कडाका वाढत आहे. यंदाच्या उन्हाळ्यात गावांना पाणीपुरवठा (Water Supply) करण्यासाठी थकित वीजबिलाचा मोठा प्रश्‍न आगामी काळात समोर येण्याची शक्यता आहे.

सोलापूर जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांकडे जवळपास ७८ कोटी ९२ रुपयांचे वीजबिल थकित असल्याची माहिती समोर आली आहे. या योजनांच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्यासाठी वीजबिलाचा प्रश्‍न अगोदर सोडवावा लागण्याची शक्यता आहे.

सोलापूर जिल्ह्यातील विहीर, बोअर, नळ योजना यासह विविध माध्यमांतून पाणीपुरवठा करणाऱ्या २ हजार १५ योजनांकडे जवळपास ७१ कोटी २५ लाख रुपयांची थकबाकी आहे.

ही माहिती महावितरणच्या वतीने जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला कळविण्यात आली आहे.

माळशिरस तालुक्यात १६ कोटी ८८ लाख, बार्शी तालुक्यात दहा कोटी ६३ लाख, करमाळा तालुक्यात ४ कोटी ८५ लाख, माढा तालुक्यात ४ कोटी ४२ लाख, मंगळवेढा तालुक्यात २ कोटी ५ लाख, पंढरपूर तालुक्यात ९ कोटी ७४ लाख, सांगोला तालुक्यात ६ कोटी ६८ लाख रुपये थकित आहेत.

अक्कलकोट तालुक्यात ६ कोटी ९८ लाख, मोहोळ तालुक्यात ४ कोटी १५ लाख, उत्तर सोलापूर तालुक्यात १ कोटी ६१ लाख तर दक्षिण सोलापूर तालुक्याकडे ३ कोटी २१ लाख रुपये थकित आहेत.

वीज बिलांची वसुली होत नसल्याने आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या महावितरणपुढे थकित रक्कम वसुलीचे मोठे आव्हान उभा राहिले आहे.

प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांकडे सात कोटी थकित

सोलापूर जिल्ह्यात असलेल्या १८ प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांकडे तब्बल ७ कोटी ६७ लाख रुपयांचे वीजबिल थकित आहे.

उन्हाळ्यात पाणीटंचाई दूर करण्यासाठी जेऊर, कोर्टी, बोरगाव (करमाळा), व्होळे (ता. माढा), आंधळगाव, नंदूर, भोसे (ता. मंगळवेढा) भाळवणी (ता. पंढरपूर) या प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना सु्रू करून गावांना पाणीपुरवठा करू शकतो.

या योजना सुरू करण्यासाठी त्यांच्याकडे थकित असलेल्या वीजबिलांचा प्रश्‍न मार्गी लावणे आवश्‍यक आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean MSP Center Closure: आळेफाट्यात सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्रे बंद

Agriculture Drone: ड्रोनची उड्डाण वाढू लागली

Sunetra Pawar Chairperson: माळेगाव कारखान्याच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवार

Cotton Picking Labour Shortage: कापूस वेचणीसाठी मजूरटंचाई

MPKV Rahuri Convocation: महात्मा फुले कृषी विद्यापीठात उद्या पदवीप्रदान समारंभ

SCROLL FOR NEXT