Loksabha Election Agrowon
ॲग्रो विशेष

Loksabha Election : निवडणुकीच्या पाहणीसाठी २३ देशांचे ७५ अभ्यासक दाखल

Election Inspection Update : जगातील सर्वांत मोठा लोकशाहीचा उत्सव म्हणविल्या जाणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या पाहणीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निमंत्रणावरून मालदिवसह रशिया, ऑस्ट्रेलिया, भूतान, बांगलादेश यासारख्या २३ देशांचे ७५ निरीक्षक दाखल झाले.

Team Agrowon

New Delhi : जगातील सर्वांत मोठा लोकशाहीचा उत्सव म्हणविल्या जाणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या पाहणीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निमंत्रणावरून मालदिवसह रशिया, ऑस्ट्रेलिया, भूतान, बांगलादेश यासारख्या २३ देशांचे ७५ निरीक्षक दाखल झाले. हे निरीक्षक महाराष्ट्र, गोवा, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्यांना भेटी देतील. नऊ मेपर्यंत हे निरीक्षक भारतात असतील.

देशात सात टप्प्यांमध्ये होत असलेल्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यातील पहिल्या दोन टप्प्यांचे मतदान पूर्ण झाले असून मंगळवारी (७ मे) तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने आंतरराष्ट्रीय संस्थांना लोकसभा निवडणुकांच्या निरीक्षणासाठी निमंत्रण दिले आहे.

यात भूतान, मंगोलिया, ऑस्ट्रेलिया, मादागास्कर, फिजी, किर्गिझ प्रजासत्ताक, रशिया, मोल्दोव्हा, ट्युनिशिया, सेशेल्स, कंबोडिया, नेपाळ, फिलीपिन्स, श्रीलंका, झिम्बाब्वे, बांगलादेश, कझाकस्तान, जॉर्जिया, चिली, उझबेकिस्तान, मालदीव, पापुआ न्यू गिनी आणि नामिबिया या २३ देशांमधील विविध संस्थांचे प्रतिनिधित्व करणारे ७५ प्रतिनिधी या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

इंटरनॅशनल फाऊंडेशन फॉर इलेक्टोरल सिस्टीम्स (IFES) चे सदस्य आणि भूतान आणि इस्रायलमधील मीडिया टीमदेखील सहभागी होतील. परदेशातील निवडणूक व्यवस्थापन संस्थांना भारतीय निवडणुकांबाबत तसेच निवडणूक आयोगाद्वारे राबविल्या जाणाऱ्या प्रक्रियेशी माहिती देण्यासाठीच्या या उपक्रमांतर्गत भारतात आलेल्या या परदेशी निरीक्षकांसोबत मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार, निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार आणि डॉ. सुखबीर सिंग संधू संवाद साधतील. त्यानंतर हे निरीक्षक गटनिहाय वेगवेगळ्या राज्यांमध्ये जातील.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT