Rabi Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Sowing : खानदेशात रब्बीची ७५ टक्के पेरणी

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात रब्बीची सुमारे ७५ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. हरभरा पेरणी आटोपली असून, गहू व मका लागवड किंवा पेरणी सुरूच आहे. यंदा पेरण्या १०० टक्के होणार नाहीत, असे संकेत सुरुवातीपासून होते. यामुळे हरभरा वगळता इतर पिकांची पेरणी मागील हंगामाच्या तुलनेत कमी होईल, असे चित्र आहे.

नोव्हेंबरच्या शेवटच्या आठ ते १० दिवसांतील पाऊस, पावसाळी स्थितीने पेरणी लांबली होती. नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत खानदेशात फक्त ६० टक्के पेरणी झाल्याचे दिसत होते. परंतु पेरणीस मागील १० ते १२ दिवसांत गती आली आहे. खानदेशात यंदा पावणेतीन लाख हेक्टरवर रब्बीची पेरणी होईल, अशी अपेक्षा आहे.

मागील हंगामात ही पेरणी चार लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात झाली होती. यंदा पेरणी धुळे व नंदुरबारसह जळगावातील पश्‍चिम भागात कमी होणार आहे. कारण या भागात पावसाची तूट अधिक होती. जळगावात आठ टक्के, धुळ्यात १८ टक्के, तर नंदुरबारात १९ टक्के एवढी पावसाची तूट होती. जळगाव जिल्ह्यात गिरणा पट्ट्यातील पेरणीला गिरणा धरणातून शेतीला पाणी न मिळाल्याने ब्रेक लागला आहे.

गिरणा धरणाच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, एरंडोल व धरणगाव या भागांतील सुमारे २१ हजार हेक्टर क्षेत्रास लाभ होतो. परंतु या भागात पेरणी सुरुवातीपासूनच कमी आहे. शिवाय या भागात पावसाचा खंडही अधिक होता. यामुळे कोरडवाहू हरभरा, दादर ज्वारीच्या पेरणीसाठी पुरेसा ओलावादेखील नव्हता.

जळगाव जिल्ह्यात सुमारे दोन लाख हेक्टरवर पेरणी अपेक्षित आहे. त्यात हरभऱ्याची पेरणी एक लाख १० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात झाली आहे. त्यापाठोपाठ ज्वारी, मका, गहू व इतर पिकांची पेरणी झाली आहे. गव्हाची पेरणी खानदेशात यंदा सहा ते साडेसहा हजार हेक्टरने कमी झाल्याचा अंदाज आहे.

गव्हाची फक्त २२ हजार हेक्टरवर पेरणी झाली असून, काही शेतकरी चोपडा, जळगाव, यावल, धुळ्यातील शिरपूर भागात गहू पेरणी करीत आहेत. परंतु ही पेरणी आणखी एक ते दीड हजार हेक्टरने वाढेल. यापेक्षा अधिकची पेरणी होणार नाही, असेही चित्र आहे.

तसेच मका लागवडीत देखील घट झाली आहे. मक्याची खानदेशात सुमारे ३० हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली असून, यंदा ही पेरणी किंवा लागवड सुमारे आठ ते नऊ हजार हेक्टरने कमी झाल्याचा अंदाज आहे. मक्याचा खर्च वाढला आहे.

तरही १८०० ते २२०० रुपये प्रतिक्विंटल, असाच आहे. मागील हंगामात रब्बीतील मक्यास फक्त १३०० ते १६०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला होता. यामुळे रब्बीतील मका लागवड कमी झाल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

नंदुरबार, धुळ्यात क्षेत्रात मोठी घट

धुळ्यातील शिंदखेडा, धुळे व साक्री भागात रब्बी जेमतेम आहे. नंदुरबारात तळोदा व शहादा वगळता इतर भागांत रब्बीची पेरणी ४० टक्क्यांनी कमी झाल्याची माहिती मिळाली. नंदुरबार तालुक्यात आतापासून टंचाई तयार झाली आहे.

धुळ्यातील साक्री व शिंदखेडा तालुक्यातही टंचाई वाढत आहे. शेतीला पाणी पुरेसे नसल्याने कांदा लागवडीत धुळे जिल्हा यंदा मागे पडल्याचे चित्र आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Red Chilli Farming : लाल मिरचीसाठी प्रसिद्ध वाढोणा बाजार गाव

PM SaurGram : टेकवडी झाले ‘पीएम सौरग्राम’

Village Development : एकात्मिक प्रयत्नांतून आर्थिक संपन्न गाव निर्मिती शक्य

Milk Production Issue : भ्रूण प्रत्यारोपित कालवडी वाटपाची घाई कशाला?

Artificial Intelligence : केंद्र सरकारकडून दिल्लीत ३ कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सेंटर्स स्थापन करण्याची घोषणा

SCROLL FOR NEXT