Agriculture Management : शेतकऱ्यांनी जमिनीचा प्रकार, बेणे, लागवड पद्धतीवर लक्ष केंद्रित करावे

Dr. Dhairyashil Lad : शेतकरी हा संशोधक असून त्यांनी संशोधनाची वृत्ती जोपासावी असे, मत कडेगाव येथील कृषी महाविद्यालयातील कृषी कीटकशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक, धैर्यशील लाड यांनी व्यक्त केले.
Dr. Dhairyashil Lad
Dr. Dhairyashil LadAgrowon
Published on
Updated on

Sangli News : ऊस उत्पादन वाढीसाठी जमिनीचा प्रकार, बेणे आणि लागवड पद्धत या महत्त्वाच्या गोष्टीकले लक्ष केंद्रित केले पाहिजे. शेतकरी हा संशोधक असून त्यांनी संशोधनाची वृत्ती जोपासावी असे, मत कडेगाव येथील कृषी महाविद्यालयातील कृषी कीटकशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक, धैर्यशील लाड यांनी व्यक्त केले.

चिंचणी (अं) (ता. कडेगाव) येथे ‘सकाळ-ॲग्रोवन’ व ‘रिवुलिस’ इरिगेशन इ. प्रा. यांच्या संयुक्त विद्यमाने ऊस उत्पादन तंत्रज्ञान व पाणी व्यवस्थापन या विषयावर ‘ॲग्रो संवादा’ चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. लाड बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच ॲड. रमेश मदने होते. यावेळी रिवुलिस इरिगेशन इ. प्रा. लि.चे मॅनेजर योगेश कुलकर्णी, प्रशांत कुलकर्णी, सागर पिसे, सागर महाडिक यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

Dr. Dhairyashil Lad
Agriculture Management : पाणी उपलब्धतेनुसार पिकांची निवड करताना...

श्री. लाड म्हणाले, ‘‘अलीकडच्या काळात रासायनिक खतांचा वापर अधिक होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी माती परीक्षणाच्या अहवालानुसारच खताचे व्यवस्थापन केले पाहिजे. ऊस पिकासाठी साधी साधी तंत्रज्ञान आणि काटेकोर नियोजन केल्यास अपेक्षित उत्पादन शक्य आहे. पिकांची फेरपालट , गांडूळ खत, शेणखत, कोंबडी खतासह पाचट माती आड केल्याने जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होते.’’

Dr. Dhairyashil Lad
Tur Production : एकात्मिक व्यवस्थापनातून तूर उत्पादनात वाढ करावी

रिवुलिस इरिगेशन इं. प्रा. लि.चे वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ नितीन जाधव म्हणाले, की आमच्या कंपनीने जगातील १२० पेक्षा अधिक देशांमध्ये काम केले आहे. इस्राईलस्थित असणाऱ्या कंपनीने उपग्रहाद्वारे पीकपाणी नियोजन विकसित केले आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त रिवुलिसचा ड्रीपरचा दर्जा चांगला असल्याने पिकाच्या गरजेनुसार पाण्याचा सर्वदूर एकसमान विसर्गाची खात्री रिवुलिसद्वारे दिली जाते.

मान्ना एरिगेशन अॅपद्वारे शेतकऱ्यांना विविध सुविधा दिल्या आहेत. शेतकऱ्यांना पाणी बचतीसाठी योग्य ते मार्गदर्शन या अॅपद्वारे केले जाते. अभिजित डाके यांनी प्रास्ताविक केले. दत्ता कोळी यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com