Takari Irrigation  Agrowon
ॲग्रो विशेष

Takari Irrigation Scheme : ताकारी योजनेवर राहणार पाणीवापर संस्थांचे नियंत्रण

Agriculture Irrigation : ताकारी योजनेच्या लाभक्षेत्रात एकूण ७३ पाणी वापर संस्थांची स्थापना झाली असून, यामधील ५३ पाणीवापर संस्थांची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

Team Agrowon

Sangli News : ताकारी योजनेच्या लाभक्षेत्रात एकूण ७३ पाणी वापर संस्थांची स्थापना झाली असून, यामधील ५३ पाणीवापर संस्थांची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यापूर्वी आठ संस्थांकडे लाभक्षेत्र हस्तांतरण प्रक्रिया झाली होती. सध्या आणखी आठ संस्थांकडे लाभक्षेत्र हस्तांतरण प्रक्रिया करण्यात आली.

ताकारी सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रात सुमारे ४०० एकर लाभ क्षेत्रासाठी एक पाणी वापर संस्था स्थापन करण्यात आली आहे. या पाणीवापर संस्थांना सिंचन व्यवस्था, पाणीआवर्तन नियोजन, पाणी नियोजन, पाणीपट्टी आकारणी व वसुली इत्यादीबाबत अधिकार असणार आहेत. सध्या ताकारी पाणीपट्टी एकरी ७ हजार ३०० रुपये आहे.

पाणीवापर संस्थांचे संचालक मंडळ निवडणूक पद्धतीने निवडले जात आहेत. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना महत्त्व राहणार आहे. तसेच या पाणीवापर संस्थांत शेतकऱ्यांना महत्त्व व अधिकार असणार आहे.

पाणीवापर संस्था योग्य पद्धतीने कारभार करीत नसल्यास त्यांना बदलण्याचा अधिकार लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना असणार आहे. ताकारी योजनेच्या लाभक्षेत्रात कार्यरत असणाऱ्या पाणी वापर संस्थांना वेगळे महत्त्व प्राप्त होणार आहे. तसेच योजना सुरळीत सुरू ठेवण्यासाठी पाणी वापर संस्था महत्त्वाची भूमिका बजविणार आहेत.

दुसऱ्या टप्प्यातील संस्थांकडे हस्तांतर

सध्या वांगी, शिवणी, अमरापूर, सोनकिरे, येवलेवाडी, चिंचणी या गावच्या संस्थांकडे लाभक्षेत्र हस्तांतर केले आहे. तसेच यापूर्वी तडसर येथील ५ संस्था, पाडळी आणि चिंचणी येथील एका संस्थेकडे लाभक्षेत्र हस्तांतर केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabi Crop Insurance 2025 : रब्बी हंगामातही पिक विमा योजनेकडे शेतकऱ्यांची पाठ; १० नोव्हेंबरपर्यत ८ हजार ३७९ शेतकऱ्यांचे अर्ज

Onion Price: कांद्याचे भाव घसरले, शेतकऱ्याने हताश होऊन उभ्या पिकावर फिरवला ट्रॅक्टर

US Election 2025: अमेरिकेतील निवडणुकांचे निकाल काय सांगतात?

Cotton Farmer Issue: कापूस उत्पादकांची चहूबाजूंनी कोंडी

Bihar Election 2025: राज्यातील लढतीचे ‘केंद्रीय’ पैलू

SCROLL FOR NEXT