Kolhapur Rain Update agrowon
ॲग्रो विशेष

Rain Update : चासकमान धरणक्षेत्रात ७१ मिलिमीटर पाऊस

Rain News : शुक्रवारी (ता.७) सकाळी आठ वाजेपर्यंत पुणे जिल्ह्यात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाच्या हलक्या ते जोरदार सरी पडल्या.

Team Agrowon

Pune News : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. शुक्रवारी (ता.७) सकाळी आठ वाजेपर्यंत पुणे जिल्ह्यात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाच्या हलक्या ते जोरदार सरी पडल्या. चासकमान धरणक्षेत्रात सर्वाधिक ७१ मिलिमीटर, तर इतर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात काहीसा चांगला पाऊस झाल्याची नोंद जलसंपदा विभागाकडे झाली आहे.

पुणे जिल्ह्यातील काही भागात अधूनमधून पाऊस पडत आहे. प्रामुख्याने पूर्व पट्ट्यातील शिरूर, दौंड, इंदापूर, बारामती भागांत कमी-अधिक स्वरूपात पाऊस पडत आहे. गुरुवारी (ता.७) सांयकाळी पुणे जिल्ह्यातील पूर्व व पश्चिम भागात चांगलाच पाऊस झाला. पूर्व भागाला उन्हाळ्यात जीवनदायी ठरणाऱ्या धरण पट्ट्यात पावसाचा प्रभाव वाढला आहे.

उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जवळपास १५ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. त्यापाठोपाठ वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात २६, नाझरे १६, विसापूर डिंभे १५, वरसगाव १४ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. इतर भागातही पावसाच्या तुरळक सरी पडल्या असून शेतकरी अजूनही जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.

गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यात बहुतांशी भागात ढगाळ वातावरण आहे. यामुळे कमी-अधिक स्वरूपात पाऊस पडत आहे. काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पाऊस पडत आहे. सध्या अनेक भागांत पावसासाठी पोषक वातावरण तयार होत ढगाळ हवामानाची स्थिती आहे. अधूनमधून ऊन पडत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात हवामान ढगाळ राहत असले तरी दुपारनंतर वातावरणात बदल होऊन सायंकाळी तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडत आहे.

काही ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी पडत आहे. त्यामुळे खरीप पेरणीसाठी दिलासा मिळणार असल्याने शेतकऱ्यांनी शेतीकामांना वेगाने सुरुवात होणार आहे. काही ठिकाणी पिकांच्या पेरणीसाठी हा पाऊस पोषक नसल्याचे मत शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागातील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा या तालुक्यांत पावसाचा जोर कमी असला तरी चांगल्या पावसाची प्रतीक्षा लागून आहे. उत्तरेकडील जुन्नर, आंबेगाव, खेड तालुक्यांत पाऊस कमी-अधिक आहे. पूर्वेकडील तालुक्यातील शिरूर, दौंड, हवेली, पुरंदर, बारामती, इंदापूर या तालुक्यांत पावसाचा जोर कमी-अधिक असून काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला आहे. त्यामुळे धरणांत अजून तरी आवक सुरू झालेली नाही.

शुक्रवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये धरण क्षेत्रनिहायझालेला पाऊस, मिलिमीटरमध्ये :

टेमघर २, पानशेत १०, खडकवासला ४, कासारसाई १, कळमोडी ४, भामा आसखेड १४, आंध्रा १, गुंजवणी ७, भाटघर १०, निरा देवघर ७, पिंपळगाव जोगे ६, येडगाव ३, चिल्हेवाडी ७, विसापूर ७.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Jayakwadi Dam Water Release: मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिलासा, जायकवाडीतून ५ नोव्हेंबरपासून रब्बीतील पहिले आवर्तन

Ahilyanagar Karjmafi : अहिल्यानगरमध्ये ४३ हजार शेतकऱ्यांची कोंडी! कर्जमुक्तीची प्रतीक्षा कधी संपणार?

Farmer Loan Waiver : कर्जमाफीचा लाभ आत्तापर्यंत किती पात्र शेतकऱ्यांना मिळाला?

Strawberry Center Ware : थेट शेतातून ग्राहकांच्या हाती! वारे येथे स्वतंत्र स्ट्रॉबेरी केंद्राचे उद्घाटन, पर्यटकांची गर्दी

Farmer Issue: आधार प्रमाणीकरणानंतरही कर्जमुक्ती नाही

SCROLL FOR NEXT