Amit Shah Agrowon
ॲग्रो विशेष

Amit Shah : ‘एनसीईएल’ला आतापर्यंत ७००० कोटींचे निर्यात प्रस्ताव

National Cooperative For Export Limited : नव्याने स्थापन झालेल्या नॅशनल कोऑपरेटिव्ह फॉर एक्सपोर्ट्स लिमिटेडला (एनसीईएल) आतापर्यंत ७००० कोटी रुपयांच्या ऑर्डर मिळाल्या आहेत, असे सहकार मंत्री अमित शहा यांनी सोमवारी (ता. २३) सांगितले.

Team Agrowon

New Delhi : नव्याने स्थापन झालेल्या नॅशनल कोऑपरेटिव्ह फॉर एक्सपोर्ट्स लिमिटेडला (एनसीईएल) आतापर्यंत ७००० कोटी रुपयांच्या ऑर्डर मिळाल्या आहेत, असे सहकार मंत्री अमित शहा यांनी सोमवारी (ता. २३) सांगितले.

एनसीईएल हे सुनिश्चित करेल की निर्यातीचे फायदे सहकारी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतील आणि निर्यातीतून एनसीईएलला मिळणाऱ्या एकूण नफ्यांपैकी सुमारे ५० टक्के हिस्सा थेट सभासद शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाईल.

नवी दिल्ली येथील पुसा संकुलात आयोजित राष्ट्रीय परिसंवादात मंत्री शहा बोलत होते. या वेळी एनसीईएलचा नवा लोगो आणि वेबसाइटचे अनावरण शहा यांच्या हस्ते करण्यात आले तसेच एनसीईएलच्या पाच सदस्यांना सदस्यत्व प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल, सहकार राज्यमंत्री बीएल वर्मा, सहकार सचिव ज्ञानेश कुमार आणि एनसीईएलचे प्रमुख पंकज कुमार बन्सल उपस्थित होते.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अमित शहा म्हणाले, की सध्या एनसीईएल तात्पुरत्या कार्यालयातून कार्यरत आहे. आम्ही कर्मचारी भरती करत आहोत. आतापर्यंत एनसीईएलला ७००० कोटी रुपयांच्या ऑर्डर मिळाल्या आहेत. एनसीईएल केवळ निर्यातीतून नफा मिळवण्यावर लक्ष केंद्रित करणार नाही तर निर्यात बाजारासाठी उत्पादने तयार करण्यासाठी शेतकऱ्यांना हाताशी धरून ठेवेल.

ते सहकारी संस्थांच्या सभासद शेतकऱ्यांना नफाही वाटून देईल. एनसीईएल सदस्य शेतकऱ्यांकडून निर्यातीचा माल एमएसपीवर खरेदी करेल. निर्यातीतून एनसीईएलला मिळणाऱ्या एकूण नफ्यांपैकी सुमारे ५० टक्के हिस्सा थेट सभासद शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाईल. हा नफा एमएसपीपेक्षा जास्त असेल, असे ते म्हणाले.

या वेळी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल म्हणाले, की एनसीईएलच्या निर्मितीमुळे निर्यातीला चालना मिळेल आणि देशाच्या विकासात आणि ग्रामीण परिवर्तनाला हातभार लागेल.

जागतिक स्तरावर भारतावर वाढता जोर असल्याने सहकार क्षेत्राला निर्यात क्षमतेचा फायदा होऊ शकतो. आंतरराष्ट्रीय मानकांचे पालन करणाऱ्या निर्यात बाजारपेठेसाठी दर्जेदार उत्पादने तयार करण्यावर सहकारी संस्थांनी भर दिला पाहिजे, असेही ते म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Milk Adulteration: भेसळयुक्त दूध आरोग्यासाठी धोकादायक; घरच्या घरी तपासा दुधातील भेसळ

River Linking Project: दुष्काळमुक्तीकडे वाटचाल, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला ७८ टीएमसी पाणी मिळणार- मुख्यमंत्री फडणवीस

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार, कापूस स्थिर, टोमॅचो आवक सुधारली, डाळिंबाला उठाव, मिरचीला उठाव टिकून

Land Acquisition: ‘शक्तिपीठ’साठी पारदर्शक भूसंपादन हवे

NA Permission Rule: शेतजमिनीवर घर बांधण्यासाठी ‘NA’ परवानगीची अट रद्द ; राज्य सरकारचा निर्णय

SCROLL FOR NEXT