Monsoon Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Monsoon Rain : परभणी जिल्ह्यात १२ पैकी ७ वर्षे कमी पावसाची

Rain Forecast : परभणी जिल्ह्याचे जून ते ऑक्टोबर या कालावधीतील पर्जन्यमानाची सरासरी ८३८.९० मिमी आहे. या कालावधीत जिल्ह्यात २०१२ ते २०२३ या १२ पैकी ७ वर्षांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला.

Team Agrowon

Parbhani News : परभणी जिल्ह्याचे जून ते ऑक्टोबर या कालावधीतील पर्जन्यमानाची सरासरी ८३८.९० मिमी आहे. या कालावधीत जिल्ह्यात २०१२ ते २०२३ या १२ पैकी ७ वर्षांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला.

तर ५ वर्षे सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. गतवर्षी (२०२३) या कालावधीतील पर्जन्यमानात ३१५.१० मिमी म्हणजेच ३७.४४ टक्के तूट आली होती. त्यामुळे टंचाईची स्थिती उद्भवली होती. जिल्ह्यात वर्ष दोन वर्षांआड कमी पाऊस होतो. शेतीमालाच्या उत्पादनात घट येते. परिणामी शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडते.

नैऋत्य मोसमी (मॉन्सून) पावसाचा हंगाम १ जून ते ३० सप्टेंबर असतो. १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर मॉन्सूनोत्तर पाऊस असतो. १ जानेवारी २८-२९ फेब्रुवारी हिवाळी पाऊस असतो तर १ मार्च ३१ मे पूर्वमोसमी पाऊस असतो. कृषी विभागाकडून जून ते ऑक्टोबर या कालावधीतील पर्जन्यमानाची आकडेवारी संकलित केली जाते. २०१९ पर्यंत परभणी जिल्ह्याची जून ते ऑक्टोबर या कालावधीतील पर्जन्यमान सरासरी ७७४.५९ मिमी होती.

२०२० च्या मे महिन्यातील शासना निर्णयानुसार वार्षिक सरासरीमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार जानेवारी ते डिसेंबर या कालावधीतील सरासरी ९३०.३० मिमी आहे. जून ते ऑक्टोबर या कालावधीतील सरासरी ८३८.९० मिमी आहे. मोसमी पावसाच्या कालावधीतील जून ते सप्टेंबर महिन्याची सरासरी ७६१.३ मिमी आहे.

२०२१ मध्ये सर्वाधिक पाऊस

जिल्ह्यात २०१२, २०१४, २०१५, २०१७, २०१८, २०२२, २०२३ या ७ वर्षांत जून ते ऑक्टोबर या कालावधीत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. तर २०१३, २०१६, २०१९, २०२०, २०२१ या ५ वर्षांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. त्यात २०२१ मध्ये सर्वाधिक ११९६.४० मिमी (१४२.६१ टक्के) म्हणजेच तुलनेत ३५७.४ मिमी एवढा जास्त पाऊस झाला होता. त्यानंतर २०२२ व २०२३ वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला.

परभणी जिल्हा २०२३ मधील जून ते ऑक्टोबर (पाऊस मिमीमध्ये)

महिना सरासरी प्रत्यक्ष झालेला पाऊस टक्केवारी

जून १४५.३ ५५.५ ३८.२

जुलै २१९.२ २११.१ ९६.३

ऑगस्ट २२७.८ ७२.२ ३१.७

सप्टेंबर १६९.० १८३.७ १०८.७

ऑक्टोबर ७७.६ १ १.३

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Injustice: शेतकरी नावडे सर्वांना

Illegal Agri Inputs: अवैधतेचे गुजरात मॉडेल

Vidarbha Irrigation Project: विदर्भातील १३ सिंचन प्रकल्प रद्द

Land Acquisition Law: भूसंपादन कायद्यातील बदलाबाबत सरकार गंभीर

BG II Cotton: ‘वनामकृवि’ कडून कपाशीचे सरळ वाण बीजी II मध्ये परिवर्तित

SCROLL FOR NEXT