Cotton Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Procurement : ‘सीसीआय’ची ६८ हजार, तर खासगी ११ लाख क्विंटल खरेदी

Cotton Market : परभणी व हिंगोली जिल्ह्यातील भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) ७ केंद्रांवर ६८ हजार ११८ क्विंटल व कृषी उत्पन्न बाजार समित्यांअंतर्गंत ४३ जिनिंग कारखान्यांमध्ये खाजगी व्यापाऱ्याकडून ११ लाख ४८ हजार ९९ क्विंटल कापूस खरेदी झाली आहे.

Team Agrowon

Parbhani News : परभणी, हिंगोली जिल्ह्यात कापूस खरेदी हंगाम अंतिम टप्प्यात असूनच राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या परभणी झोन अंतर्गंत शुक्रवार (ता. १९) अखेर परभणी व हिंगोली जिल्ह्यातील भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) ७ केंद्रांवर ६८ हजार ११८ क्विंटल व कृषी उत्पन्न बाजार समित्यांअंतर्गंत ४३ जिनिंग कारखान्यांमध्ये खाजगी व्यापाऱ्याकडून ११ लाख ४८ हजार ९९ क्विंटल कापूस खरेदी झाली आहे. या दोन जिल्ह्यात सीसीआय आणि खाजगी मिळून एकूण १२ लाख १६ हजार २१७ क्विंटल कापूस खरेदी झाली आहे.

भारतीय कापूस महामंडळाची (सीसीआयची) परभणी जिल्ह्यातील जिंतूर, बोरी, सेलू, मानवत, ताडकळस या ५ केंद्रांवर एकूण ६३ हजार १३३ क्विंटल व हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली येथे १ हजार २८३ क्विंटल शिरडशहापूर (ता. औंढा नागनाथ) येथील केंद्रावर ३ हजार ७०२ क्विंटल मिळून एकूण ४ हजार ९८५ क्विंटल कापूस खरेदी झाली.

सीसीआयीची या दोन जिल्ह्यातील ७ केंद्रावर ६८ हजार ११८ क्विंटल कापूस खरेदी झाली आहे. चांगल्या दर्जाच्या कापसाचे खुल्या बाजारातील दर हमीभावापेक्षा जास्त आहेत.

त्यामुळे सीसीआयची खरेदी केंद्रावरील कापूस खरेदी मागील काही आठवड्यापासून ठप्प आहे. परभणी व हिंगोली जिल्ह्यांमधील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये जाहीर लिलावाद्वारे खाजगी व्यापाऱ्याकडून कापूस खरेदी केली जात आहे. त्यात परभणी जिल्ह्यातील परभणी, जिंतूर, बोरी, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, ताडकळस या ९ बाजार समिती अंतर्गंत ३९ जिनिंग कारखान्यांमध्ये १० लाख ८० हजार ७६७ क्विंटल कापूस खरेदी झाली आहे.

हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली व आखाडा बाळापूर बाजार समित्यांतर्गंतच्या ४ जिनिंग कारखान्यांमध्ये ६७ हजार ४३२ क्विंटल कापूस खरेदी झाली आहे. या दोन जिल्ह्यात खासगी व्यापाऱ्यांकडून ११ लाख ४८ हजार ९९ क्विंटल कापूस खरेदी झाली आहे. मागील आठवड्यात कापसाला प्रतिक्विंटल सरासरी ७४०० ते ७७०५ रुपये दर मिळाले, अशी माहिती पणन महासंघाच्या सूत्रांनी दिली.

सीसीआय कापूस खरेदी स्थिती (क्विंटलमध्ये)

केंद्र ठिकाण कापूस खरेदी

जिंतूर १३५६९

बोरी ११८७७

सेलू १६७८०

मानवत २०१९३

ताडकळस ७१४

हिंगोली १२८३

शिरडशहापूर ३७०२

खासगी कापूस खरेदी स्थिती (क्विंटलमध्ये)

बाजार समिती जिनिंग संख्या कापूस खरेदी

परभणी ७ १६६०७८

जिंतूर ४ १४२८१७

बोरी १ ४८२२६

सेलू ६ २६८२२२

मानवत १३ ३४२०७३

पाथरी २ २१

सोनपेठ १ २८८४२

गंगाखेड ३ १८५६३

ताडकळस २ ४४१८२

हिंगोली ३ ६१४३२

आखाडा बाळापूर १ ५९००

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Relief: मराठवाडा दुष्काळग्रस्त जाहीर करून तातडीने मदत द्या

Exam Stress Relief : परीक्षा जवळ आलीये अन् टेन्शन वाढलंय? 'या' सोप्या टिप्सने ताण होईल छुमंतर!

Women Farmers Contribution: मोरोक्कोच्या बहरलेल्या शेतीतील अदृश्य हात

Interview With Rakesh Kaithwas : शेतकरी कंपन्यांच्या बळकटीकरणातून मूल्यवर्धनाला चालना

Bullock Safety Tips: बैलाच्या वजनानुसार बैलगाडीत किती ऊस भरावा?

SCROLL FOR NEXT