Sugar Factory Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Crushing : मराठवाडा, खानदेशात ६८ लाख ४५ हजार टन उसाचे गाळप

Sugarcane Production : जानेवारी अखेरपर्यंत ६८ लाख ४५ हजार ३३१ टन उसाचे गाळप केले. या गाळपातून ५७ लाख २२ हजार ४९२ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : येथील प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालय अंतर्गत येणाऱ्या मराठवाडा व खानदेशातील पाच जिल्ह्यांतील २२ साखर कारखान्यांनी (ता. ६) जानेवारी अखेरपर्यंत ६८ लाख ४५ हजार ३३१ टन उसाचे गाळप केले. या गाळपातून ५७ लाख २२ हजार ४९२ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.

आजवरच्या ऊस गाळपात सहभाग घेणाऱ्या कारखान्यांमध्ये १३ सहकारी, तर ९ खासगी कारखान्यांचा समावेश आहे. १३ सहकारी साखर कारखान्यांनी ३१ लाख ८४ हजार ७४९ टन उसाचे गाळप केले. या गाळपातून सरासरी ७.८६ टक्के साखर उताऱ्याने २५ लाख १ हजार ७१२ क्विंटल साखरेचे उत्पादन केले.

दुसरीकडे ९ खासगी साखर कारखान्यांनी ३६ लाख ६० हजार ५८२ टन उसाचे गाळप करताना सरासरी ८.८ टक्के साखर उताऱ्याने ३२ लाख २० हजार ७८० क्विंटल साखरेचे उत्पादन केले. तसेच एकूण कारखान्यांपैकी जळगाव जिल्ह्यातील एका खासगी कारखान्याच्या गाळप हंगाम थांबला असल्याची माहिती प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाच्या वतीने देण्यात आली.

जिल्हानिहाय ऊस गाळप व साखर उत्पादन

नंदुरबार जिल्हा : जिल्ह्यातील एक सहकारी व एक खासगी मिळून दोन कारखान्यांनी ७ लाख ९० हजार ७९४ टन उसाचे गाळप केले. या गाळपासून सरासरी ८.३८ टक्के साखर उताऱ्याने ६ लाख ६२ हजार ९१८ क्विंटल साखरेचे उत्पादन केले.

जळगाव जिल्हा : जळगाव जिल्ह्यातील एक सहकारी व एका खासगी कारखान्याने गाळप हंगामात सहभाग घेतला. या दोन्ही कारखान्यांनी १ लाख ८४ हजार ११९ टन उसाचे गाळप करत सरासरी ८.८५ टक्के साखर उताऱ्याने १ लाख ६३ हजार ६ क्विंटल साखरेचे उत्पादन केले.

छत्रपती संभाजीनगर जिल्हा : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ३ सहकारी व ३ खासगी मिळून सहा कारखान्यांनी गाळप हंगामात सहभाग घेतला. या कारखान्यांनी १३ लाख ३५ हजार ७८० टन उसाचे गाळप केले. या गाळपातून सरासरी ९.२७ टक्के साखर उताऱ्याने १२ लाख ३७ हजार ७०५ क्विंटल साखरेचे उत्पादन केले.

जालना जिल्हा : जालना जिल्ह्यातील तीन सहकारी व दोन खासगी मिळून ५ कारखान्यांनी गाळप हंगामात सहभाग घेतला. या कारखान्यांनी १७ लाख २४ हजार ५३८ टन उसाचे गाळप केले. या गाळपातून ८.९२ टक्के साखर उताऱ्याच्या सरासरीने १५ लाख ३८ हजार ८९५ क्विंटल साखरेचे उत्पादन केले.

बीड जिल्हा : बीड जिल्ह्यातील एकूण पाच सहकारी व दोन खासगी मिळून ७ कारखान्यांनी गाळप हंगामात सहभाग नोंदविला. या कारखान्यांनी २८ लाख १० हजार ९९ टन उसाचे गाळप करताना सरासरी ७.५४ टक्के साखर उताऱ्याने २१ लाख १९ हजार ९६८ क्विंटल साखरेचे उत्पादन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Rain: विदर्भात काही ठिकाणी पावसाचा अंदाज; राज्यातील बहुतांशी भागात पावसाचा जोर कमीच राहणार

Manmad APMC : मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत सत्तांतराच्या हालचाली

Humani Pest Outbreak : मानोरा तालुक्यात हुमणी अळीचा प्रकोप

Farmer Loan Waiver : व्याजमाफी करून मुदलाचे हप्ते करून द्या

Agriculture Solar Pump : सोलरही नाही अन् पैसेही परत मिळेना

SCROLL FOR NEXT