Ratnagiti DCC Bank Agrowon
ॲग्रो विशेष

Ratnagiri DCC Bank : रत्नागिरी जिल्हा बँकेला ६८ कोटी ५३ लाखांचा नफा

Co-operative Bank Profit : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला २०२३-२४ या आर्थिक वर्षात ६८ कोटी ५३ लाख रुपयांचा ऐतिहासीक विक्रमी ढोबळ नफा झाला आहे.

Team Agrowon

Rtanagiri News : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला २०२३-२४ या आर्थिक वर्षात ६८ कोटी ५३ लाख रुपयांचा ऐतिहासीक विक्रमी ढोबळ नफा झाला आहे. पुढील आर्थिक वर्षात पाच हजार कोटी रुपयांचा व्यवसाय, शंभर कोटी रुपयांचा ढोबळ नफा मिळण्याचे नियोजन बँकेने केल्याची माहिती अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

बँकेच्या प्रधान कार्यालयातील सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात केलेल्या व्यवसायाची माहिती डॉ. तानाजीराव चोरगे यांनी दिली. उपाध्यक्ष बाबाजी जाधव, संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी अजय चव्हाण, सरव्यवस्थापक डॉ. सुधीर गिम्हवणेकर आदी उपस्थित होते.

आर्थिक वर्षअखेर बँकेच्या ठेवी २५९२ कोटी ८१ लाख रुपयांच्या, कर्जव्यवहार १९६१ कोटी रुपये असा एकूण ४५५३ कोटी ८३ लाख रुपयांचा एकूण व्यवसाय झालेला आहे. गतवर्षीच्या तुलनेने ठेवींमध्ये १८२ कोटी ७३ लाख रुपये, कर्जव्यवहारात २९८ कोटी ९७ लाख रुपये, ढोबळ नफ्यात २१ कोटी २० लाख रुपयांनी वाढ झाली आहे.

बँकेचा ढोबळ एनपीए २.४१ टक्के असून नक्त एनपीए शून्य टक्के आहे. सलग बारा वर्षे बँकेचा एनपीए शून्य टक्के आहे. सलग तेरा वर्षे बँकेने ‘अ’ ऑडिट वर्ग प्राप्त केल्याची माहिती डॉ. चोरगे यांनी दिली. राज्य शासनाने जाहीर केलेल्या विविध कर्जमाफी योजनांची जिल्हा बँकेने प्रभावीपणे अंमलबजावणी केली आहे.

राज्य शासनाकडून यापोटी १८ कोटी रुपयांची रक्कम अद्याप बँकेला देणे आहे. राज्यातील २५ साखर कारखान्यांना दिलेल्या ९०० कोटींची कर्जवसुली यंदा प्रथमच १०० टक्के झाली. ‘नाबार्ड’, आरबीआय यांची बंधने जिल्हा बँकेवर असून त्यानुसार कार्यालयीन कामकाज सुरू असते. राष्ट्रीय बँकांसह अर्बन बँका, पतसंस्था यांच्यावर ‘नाबार्ड’, आरबीआयचे कोणतेही बंधन नसल्याने ठेवींवर ते मनाप्रमाणे व्याज देऊ शकतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heavy Rain Alert : राज्यात आज पाऊस दणका देणार ; कोकण, घाटमाथ्यावर ऑरेंज तर राज्यभरात येलो अलर्ट

Agricultural Trade : भारत १४० कोटी लोकांचा देश तरीही आमच्याकडून एक पोत मका घेत नाही?; ट्रम्प यांच्या मंत्र्याचा सवाल

Sugar Export : साखर निर्यातीचा मार्ग मोकळा होणार?

Toll Road India : ‘टोल’धाडीचे राजकीय अर्थशास्त्र

Return Monsoon : गेले परतीच्या वाटे...

SCROLL FOR NEXT