Water Level Agrowon
ॲग्रो विशेष

Water Storage : यवतमाळ जिल्ह्यातील प्रकल्पांत ६७ टक्के जलसाठा

Water Level : यवतमाळ जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या सरासरीच्या तुलनेत समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे आजघडीला तीन मोठ्या, सात मध्यम व ६५ लघू प्रकल्पांत ६७ टक्के जलसाठा शिल्लक आहे.

Team Agrowon

Yavatmal News : यवतमाळ जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या सरासरीच्या तुलनेत समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे आजघडीला तीन मोठ्या, सात मध्यम व ६५ लघू प्रकल्पांत ६७ टक्के जलसाठा शिल्लक आहे. जलसाठा मुबलक असल्याने यंदा उन्हाळ्यात नागरिकांची पाण्यासाठी होणारी पायपीट थांबण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात दर वर्षी उन्हाळ्यात नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. गेल्या वर्षी जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. त्यामुळे नदी, नाले व प्रकल्पांत बराच जलसाठा शिल्लक आहे. जलसाठा असल्याने शेतकऱ्यांपासून ते प्राण्यांनाही टंचाईची झळ सोसावी लागणार नाही.

गेल्या वर्षी काही भागांत तीव्र पाणीटंचाई होती. शहरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे नळ पाच ते सहा दिवसांनंतर येत होते. अनेकांना तर पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. अनेक लघू प्रकल्प कोरडे झाले होते. यंदा मार्च, एप्रिलमध्ये नागरिकांना पाण्याची चणचण भासणार नसल्याची स्थिती आहे.

जिल्ह्यात पूस, अरूणावतील, बेंबळा मोठे प्रकल्प आहेत. अडाण प्रकल्प, नवरगाव, गोकी प्रकल्प, वाघाडी, सायखेडा, अधर पूस व बोरगाव असे सात मध्यम प्रकल्प आहेत. याशिवाय ६५ लघू प्रकल्प आहेत. जिल्ह्यातील पूस, अरुणावती, बेंबळा या मोठ्या प्रकल्पात आजच्या स्थितीला ८२.८१ टक्के जलसाठा उपलब्ध आहे.

अरुणावती ७३.३१, बेंबळा ४२.९२ टक्के जलसाठा आहे. अडाण प्रकल्पात ८२.१४, गोकी ८६.२६, वाघाडी ८५.०४, सायखेडा ६३.७६, लोअरपूस ९२.१९, बोरगाव ७२.७७, नवरगाव ६५.७१ टक्के जलसाठा आहे. ६५ लघू प्रकल्पातही ६० टक्के जलसाठा शिल्लक आहे.

एकच लघू प्रकल्प कोरडा

जिल्ह्यात ६५ लघू प्रकल्प आहेत. सद्यःस्थितीत केवळ वणी तालुक्यातील बोरडा हा एकमेव लघू प्रकल्प कोरडा पडलेला आहे. इतर लघू प्रकल्पांपैकी मोजके प्रकल्प वगळल्यास सर्वच प्रकल्पांत मुबलक जलसाठा शिल्लक आहे. बहुतांश लघू प्रकल्पातही जलसाठा ५० टक्क्यांच्या वरच आहे. बऱ्यापैकी जलसाठा असल्याने शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधाही मिळत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT