Water Scarcity Agrowon
ॲग्रो विशेष

Water Scarcity : जालना जिल्ह्यात‘टंचाई’साठी ६७ कोटींचा आराखडा

Water Shortage : एक हजार ३१४ विहिरींचे अधिग्रहण करण्याची वेळ येणार असून यासाठी तब्बल ६७ कोटी ८२ लाख ५३ हजारांचा खर्च अपेक्षित आहे. या अपेक्षित खर्चाचा आराखड्याला जिल्हा प्रशासनाकडून मंजुरी देण्यात आली आहे.

Team Agrowon

Jalna News : जालना जिल्ह्यात यंदा पाऊस न झाल्याने पाणी टंचाईचा निर्माण निर्माण झाली आहे. आज घडीला जिल्ह्यात तब्बल १०२ टँकर सुरू आहेत. अशात पुढील जूनपर्यंत ही पाणी टंचाई भयावह होणार असून तब्बल एक हजार २३४ गावांसह १९९ वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा करावा लागणार आहे.

शिवाय एक हजार ३१४ विहिरींचे अधिग्रहण करण्याची वेळ येणार असून यासाठी तब्बल ६७ कोटी ८२ लाख ५३ हजारांचा खर्च अपेक्षित आहे. या अपेक्षित खर्चाचा आराखड्याला जिल्हा प्रशासनाकडून मंजुरी देण्यात आली आहे.

यंदा जिल्ह्यात अल्प पाऊस झाला. त्यामुळे लघू व मध्यम प्रकल्पांमधील पाणीसाठा शेवटची घटका मोजत आहे. आज घडीला जिल्ह्यात सात मध्यम व ५७ लघू प्रकल्पात केवळ ६.७९ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. शिवाय जिल्ह्यातील पाणी पातळी सव्वादोन मीटरपेक्षा अधिक खालावली आहे.

त्यामुळे आज घडीला ५० गावांसह २४ वाड्यांवरील नागरिकांना १०२ टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. त्यात आता जानेवारी ते जून या कालावधीत पाणी टंचाईची तीव्रता अधिक वाढणार आहे.

त्यामुळे पुढील दहा महिने म्हणजे जानेवारी आणि जून महिन्यादरम्यान जिल्ह्यातील एक हजार २३४ गावांसह १९९ वाड्यांमध्ये पाणी टंचाईचा प्रश्‍न निर्माण होण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाच्या अहवालात नमूद करण्यात आली आहे.

या गावांतील नागरिकांना पाणी पुरवठा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून खासगी विहिरी अधिग्रहण आणि टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी ६७ कोटी ८२ लाख ५३ हजारांचा टंचाई आराखडा मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे यंदाचा उन्हाळा हा जिल्ह्यासाठी दुष्काळी काळ असणार असल्याचे विदारक चित्र आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT