Padma Award Agrowon
ॲग्रो विशेष

Padma Award : राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींनी केले ६६ जनांना पद्म पुरस्कारांनी सन्मानित

Padma Award Ceremony : सोमवारी (ता.२२) संध्याकाळी राष्ट्रपती भवनात पद्म पुरस्कार वितरण समारंभ पार पडला. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी माजी उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांचा पद्मविभूषण देऊन सन्मान केला.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : सोमवारी (ता.२२) संध्याकाळी राष्ट्रपती भवनात पुरस्कार वितरण समारंभ पार पडला. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कार प्रदान केले. यावेळी मुर्मू यांनी ३ पद्मविभूषण, ८ पद्मभूषण आणि ५५ पद्मश्री असे पुरस्कार प्रदान केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाहांसह इतर मान्यवर उपस्थित होते. सरकारने यावर्षी २५ जानेवारीला रोजी पद्म पुरस्कारांची घोषणा केली होती.

२०२४ साठी १११ जणांना पद्मश्रीची घोषणा

२०२४ साठी ५ जणांना पद्मविभूषण, १७ जणांना पद्मभूषण आणि १११ जणांना पद्मश्रीची घोषणा करण्यात आली होती. यापैकी आज ६६ जनांना पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. तर इतरांचा सन्मान पुढील आठवड्यात करण्यात येणार आहे.

पद्मविभूषण पुरस्कार

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी माजी उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, बिंदेश्वर पाठक (मरणोत्तर), कोनिडेला चिरंजीवी, वैजयंतीमाला बाली आणि पद्मा सुब्रमण्यम यांना पद्मविभूषण देऊन सन्मानित केले. यावेळी बिंदेश्वर पाठक यांच्या पत्नी अमोला पाठक यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

३० महिलांचा गौरव

यावेळी पद्म पुरस्कार प्राप्त करणाऱ्यांमध्ये विविध क्षेत्रातील ३० महिलांचा समावेश असून नऊ व्यक्तींना मरणोत्तर पद्म पुरस्कार सन्मानित करण्यात आले आहे. तसेच परदेशी आठ व्यक्तींनाही पद्म पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

१७ जणांना पद्मभूषण

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी एम फातिमा बीवी (मरणोत्तर), होर्मुसजी एन कामा, मिथुन चक्रवर्ती, सीताराम जिंदाल, यंग लिऊ, अश्विन बालचंद मेहता, सत्यब्रत मुखर्जी (मरणोत्तर), राम नाईक, तेजस मधुसूदन पटेल, ओलान्चेरी राजगोपाल, राजगोपाल, राजगोपाल दादाजी, राजकुमार दास यांचा सन्मान केला. तोगडन रिनपोचे (मरणोत्तर), प्यारेलाल रामप्रसाद शर्मा, चंदेश्वर प्रसाद ठाकूर, उषा उथुप, विजयकांत (मरणोत्तर), कुंदन आर व्यास यांना पद्मभूषणने सन्मानित करण्यात आले.

पद्म पुरस्कार

पद्म पुरस्कार, देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक असून तो पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या तीन श्रेणींमध्ये दिला जातो. हा पुरस्कार कला, सामाजिक कार्य, सार्वजनिक घडामोडी, विज्ञान आणि अभियांत्रिकी, व्यापार आणि उद्योग, वैद्यक, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा, नागरी सेवा आणि इतर क्षेत्रांत उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्यांना दिला जातो. अपवातर दात्मक उच्च दर्जाच्या विशिष्ट सेवेसाठी पद्मभूषण आणि कोणत्याही क्षेत्रातील विशिष्ट सेवेसाठी पद्मश्री पुरस्कार दिला जातो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ativrushti Madat GR : अतिवृष्टीबाधितांना ४८० कोटी रुपयांच्या निधी वाटपास मान्यता; शासन निर्णय जारी

Crop Loan: खरीप हंगामात केवळ ३५ टक्के पीककर्ज वाटप

Ethanol Blending: पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण २७ टक्क्यांपर्यंत वाढवा, साखर उद्योगाची मागणी

Cotton Procurement: कापूस खरेदी नोंदणी जलद व पारदर्शक करण्यासाठी ‘ॲग्रीस्टॅक पोर्टल’चा वापर करावा: पणन मंत्री जयकुमार रावल

Dust Pollution: धुळीमुळे श्वसनाच्या आजारात वाढ

SCROLL FOR NEXT